गटविकास अधिकार्‍याच्या छळाला कंटाळून ग्रामसेविकेचा आत्महत्येचा प्रयत्न…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील पारोळा पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्याने 36 वर्षीय ग्रामसेविकेला वारंवार छळ करून शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी आज ग्रामसेविकेच्या फिर्यादीवरून गटविकास अधिकारी यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील 36 वर्षीय ग्रामसेविका रा मुकटी ता.जिल्हा धुळे यांनी पारोळा तालुका येथे सन 2018 पासून ग्रामसेविका म्हणून कार्यरत आहे त्यांच्याकडे करंजी व म्हसवे येथील ग्रामसेवक पदाचा चार्ज आहे. ते आपल्या पदावर काम करत असताना 12 डिसेंबर 2021 पासून रुजू झालेले गटविकास अधिकारी विजय दत्तात्रेय लोंढे (44) रा.जळगाव यांनी तेव्हापासून ग्रामसेविकेला आपल्या दालनात बोलून चित्र विचित्र प्रकारे हावभाव करत आपल्याजवळ खेचण्याचा प्रयत्न केला.

ही बाब ग्रामसेविकेच्या लक्षात आल्यावर तिने गटविकास अधिकारी यांना सांगितले की मी त्यातली नाही मी माझ्या पतीला सांगेन यावेळी गटविकास अधिकारी यांनी सांगितले की, मी तुला बदनाम करून टाकेल असे सांगितल्यानंतर त्यानंतर देखील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या दिवशी गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेविकेस कारणे दाखवा नोटीस दिली. याबाबत त्यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या दालनात गेली असता त्यांनी सांगितले की अजूनही वेळ गेलेली नाही सर्व व्यवस्थित करून देईल असे सांगितले. या गोष्टीच्या निराशेतून व त्यांच्या छळाला कंटाळून मी जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्याने माझी तब्येत खराब झाली होती. म्हणून याबाबत औषध उपचार करून आज पारोळा पोलीस स्टेशनला गटविकास अधिकारी यांच्याविरुद्ध भादवि कलम 354, अ, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.