वडगाव टेक येथील मजुराचा अपघातात मृत्यू…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तालुक्यातील वडगाव टेक येथील एका ४५ वर्षीय हात मजुराचा मोटरसायकल घुसरुन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ८ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास वडगाव टेक येथील केटीवेअर जवळ घडली असुन घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथील रहिवाशी प्रविण वामन पाटील (४५) हे ८ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास मोटरसायकलने वडगाव टेक येथील केटीवेअर वरुन जात असतांना प्रविण पाटील हे केटीवेअर वरुन खाली पडले आणि त्यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती ग्रामस्थांना कळताच त्यांनी प्रविण पाटील यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांनी प्रविण पाटील यांना मृत घोषित केले.

घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल भगवान बडगुजर हे करीत आहे. मयत प्रविण पाटील यांचे पश्चात वृद्ध आई, पत्नी, दोन मुली, एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने वडगाव टेक परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.