जंगलात गप्पा मारणाऱ्या प्रेमीयुगुलाला चौघांनी मारहाण करून लुटले !

0

मुक्ताईनगर ;- तालुक्यातील माळेगाव जंगल परिसरात मित्र मैत्रीण दोन्ही गप्पा मारत असताना चार अनोळखी इसमांनी येऊन दोघांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील दोन मोबाईल, सोन्याचे कानातील रिंग , आणि रोकड घेऊन पोबारा केल्याची घटना उघड झाली असून याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, व्यवसायाने इलेकट्रीशियन असलेला बाळू दिनकर वाघ वय २८ रा. खडकोद ता. बऱ्हाणपूर हा त्याच्या मैत्रिणीसोबत ३ जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जय महाकाली मंदिर माळेगाव येथे फिरायला आले असता जंगलात गप्पा मारत असताना अनोळखी चार जणांनी ५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि ६ हजारांची रोकड आणि एक ग्राम वजनाचे सोन्याचे कानातील डूल असा एकूण २२ हजारांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून मारहाण करून धमकी दिली. याप्रकरणी ४ अनोळखी इसमाविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपस पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.