Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»“भ्रष्टाचारियों के ‘दाग अच्छे हैं” बस वो भाजपा में आ जाए : धनंजय रामकृष्ण शिंदे
    राजकारण

    “भ्रष्टाचारियों के ‘दाग अच्छे हैं” बस वो भाजपा में आ जाए : धनंजय रामकृष्ण शिंदे

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 4, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही, न्यूज नेटवर्क

    महाराष्ट्राचा राजकारणात अजून एक भ्रष्टाचाराचा भूकंप झाला प्रत्येक भ्रष्टाच्याऱ्याला आम्ही पक्षात घेऊ आणि त्याच्यावरची कार्यवाही बंद करू अशा पद्धतीने भाजपाने संपूर्ण महाराष्ट्रात जे गलिच्छ राजकारण सुरू केले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील 13 करोड जनतेवर होत आहे. आणि दूरपर्यंत होणार आहे, संविधानाची पायमल्ली करून आपल्याला सोईस्कर होईल या पद्धतीने कायद्याची तोडमोड करून सत्ता कशी ताब्यात घेता येईल, हे भाजपा करीत आहे. अनेक आमदार आणि खासदारांच्या बाबतीत भाजपा षडयंत्र करून, पैसा देऊन, ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून आज महाराष्ट्रातील तमाम भ्रष्टाचाऱ्याना बीजेपी आपल्या पार्टीत घेत आहे.

    शिंदे, राणे, अजित पवार असे वेगवेगळे मोहरे वेगवेगळ्या आघाडीवर पाठवून मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस त्यांना व्यवस्थीत हाताळत आहेत, भ्रष्टाचाराने माखलेले चेहरे घेवून भाजपा देशात अस्थिरता निर्माण करीत आहे.

    महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या घटनांमुळे संतप्त व दु:खी झालेल्या जनतेने हे जाणून घेतल पाहिजे की भारतातील पारंपरिक पक्षांचे नेते जनतेच्या सेवेसाठी राजकारणात नाहीत. ते सत्ता, भ्रष्टाचार, प्रसिद्धी, आर्थिक फायद्यासाठी राजकारणात आहेत. ते विचारधारा, पक्ष किंवा लोकांशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत. ते लोक सेवेमुळे नाही तर त्यांच्या जाती, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि पैशाच्या ताकदीमुळे निवडून आले आहेत. अशा राजकारण्यांना भाजपा ईडी, सीबीआय, आयटीच्या रडारखाली वाकवून पक्ष बदलण्यास किंवा आपल्याला सपोर्ट करण्यास भाग पाडत आहे.

    परंतु महाराष्ट्रातील जनतेला “आम आदमी पार्टी” (Aam Aadmi Party) म्हणजे आशेचा किरण आहे, आप एकमेव असा पक्ष आहे जो सीबीआय आणि ईडीच्या चुकीच्या कार्यवाहीनंतरही अखंड आणि वैचारिकदृष्ट्या एकजूट आहे. चिखलाच्या राजकारणात आदर्श म्हणून उभे राहण्याची फक्त आप कडे ताकद आहे, महाराष्ट्राच्या जनतेला सुगीचे दिवस फक्त आम आदमी पार्टीच आणू शकते, या प्रस्थापितांच्या विश्वासघातकी, स्वार्थी आणि भ्रष्ट राजकारणाच्या विरोधात सर्व जनतेला एकत्र येऊन लढावे लागेल व मत पत्रिकेतून या सर्व प्रस्थापित भ्रष्ट राजकारण्यांना उत्तर द्यावं लागेल असे वक्तव्य आम आदमी पार्टी महाराष्ट्रचे नेते मा. धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी दिली.

    या पत्रकार परिषदेस आम आदमी पक्षाचे राज्याचे नेते मा. धनंजय रामकृष्ण शिंदे यांच्या सोबत विभागीय नेते मधुकर फर्डे, मुरालीलाल पचौरी, सतीश सलुजा, अमर आमटे, अक्षरा पटेल, अशोक वाल्मिकी, रमेश वर्मा, हर्षल घाडगे ठाणे, विनोद गुप्ता, कैलास कटके, अशोक यादव इत्यादी नेते उपस्थित होते.

    #maharashtra #politics Aam Aadmi Party
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

    May 18, 2026

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif