जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री बदलाचे वारे !

0

जळगाव ;- राज्यात नुकतीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकारमध्ये सामील झाल्याने आता शिंदे – फडणवीस सरकारची यामुळे आणखी ताकद वाढली आहे. शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादीकडून अमळनेरचे आमद्रयें अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच त्यांची प्रतोद पदी निवड करण्यात आली आहे.

त्यामुळे या रूपाने अनिल पाटील यांना एक महत्वाचे पद मिळाले असून ते अजित पवार यांचे निष्ठावान समजले जातात. त्यामुळे त्यांची वर्णी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्याला तीन पक्षाचे तीन बलाढ्य मंत्री मिळाले आहेत . भाजपचे गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू व्यक्ती म्हणून मानले जातात. त्यांच्याकडे ग्राम विकास आणि वैद्यकीय शिक्षण सारखे महत्वाचे खाते आहे . तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खांदेसमर्थक मानले जातात. त्यांच्याकडेही पाणीपुरवठा आणि जळगाव तसेच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. तर आता नव्याने मंत्रिपद मिळालेले अनिल भाईदास पाटील हे पूर्वाश्रमीचे भाजपचे असले तरी ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले एकमेव मंत्री आहेत.

एककेकाळी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार सर्वाधिक असताना आता केवळ एक आमदार अनिल पाटील यांच्या रूपाने आहे. राष्ट्रवादीला आलेली जिल्ह्यातील मरगळ दूर करण्यासाठी आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी अनिल पाटील यांना जळगाव जिल्ह्याचे मंत्रिपद मिळावे अशी अपेक्षा आता होऊ लागली आहे . तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे एकाचवेळी तीन जिल्ह्याचे यात धुळे,लातूर आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. ते अनुभवी आणि कार्यकुशल मंत्री असल्याने त्यांच्याकडेही जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपवावे अशी अपेक्षा जनसामान्यातून होत आहे. जिल्ह्याचा विकास पाहिजे त्या प्रमाणात न झाल्याने लोकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. जळगाव शहरातील रस्ते , जिल्ह्यात रखडलेले सिंचन प्रकल्प , इतर विकास कामे यांना निधी प्राप्त झाल्याचे अथवा निधी मिळवून देण्याचे म्हटले जाते . मात्र पहिजे त्या प्रमाणात या प्रकल्पना गती प्राप्त होत नाही.

केवळ आश्वासन आणि घोषणांचा पाऊस पाडून ती कामे वेळेच्या आत होणे अपेक्षित असताना केवळ रखडली गेली असल्याची भावना जनमानसात दिसून येत आहे. तर दुसरीकडे मंत्री पदाचा अनुभव नसलेले अनिल भाईदास पाटील यांना पालकमंत्री पद दिल्यास त्यांच्या तालुक्यातील रखडलेला पाडळसरे सिंचन प्रकल्प ते प्राधान्याने सोडवतील असेही म्हटले जात आहे. त्यामुळे अनिलदादा अजित दादांकडे आग्रह धरून जिल्ह्याचे पालकमंत्रिपद पदरी पाडण्याची शक्यता निर्माण झाल्याने पालकमंत्री पदाच्या बदलीचे वारे वाहू लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.