विवाहितेला विनाकारण मारहाण करून जिवेंठार मारण्याची धमकी

0

जळगाव ; विवाहितेला कारण नसतांना मारहाण व जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार पिंप्राळ्यातील माहेर असलेल्या विवाहितेसोबत घडला आहे. याप्रकरणी सोमवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात माहेर आलेल्या प्रियंका अविनाश बाविस्कर (वय-२३) यांचा विवाह अमळनेर येथील अविनाश शांताराम बाविस्कर यांच्याशी झाला आहे. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती अविनाश बाविस्कर याने काहीही कारण नसतांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर लहान लहान गोष्टींवरून वाद घालून विवाहितेला मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. शिवाय सासू, सासरे आणि नणंद यांनी देखील शारिरीक व मानसिक त्रास दिला. हा प्रकार घडल्यानंतर विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर विवाहितेने सोमवारी ३ जुलै रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पती अविनाश शांताराम बाविस्कर, सासरे शांताराम राजधर बाविस्कर, सासू निर्मला शांताराम बाविस्कर आणि नणंद गौरी भूषण वानखेडे सर्व रा. अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक कालसिंग बारेला करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.