तरुणाच्या पाठीवर सुरीने वार करून मोबाईल लांबविला

0

थोरगव्हाण सावदा दरम्यानची घटना ‘ दरोड्याचा गुन्हा दाखल

सावदा ;- दुचाकीवरून सावद्याकडे जाणाऱ्या यारूनचया पाठीवर चाकूने हल्ला करून त्याच्या जवळील मोबाईल दुसर्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरटयांनी मोटारसायकलवरून जाणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला करून त्याच्याकडचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावदा शहरातील रहिवासी अर्शद बासीद खाटीक (वय३४) याने फिर्याद दिल्या नुसार२ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास थोरगव्हाण येथून सावदा येथे येत होता. यानंतर अचानक मागच्या बाजूने पॅशन प्रो या मॉडेलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्याच्यावर चाकूने हल्ला करून त्याच्याकडचा ओपो एफ-२१ हा स्मार्टफोन घेऊन पळ काढला.

या प्रकरणी अर्शद बासीद खाटीक ( रा. रजानगर, सावदा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.