कोयता गँगचा पुन्हा कहर, पुणे पोलिसांच्या नाकात दम

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

कोयता गँगचा कहर पुण्यात थांबेल असं वाटत असतांनाच चतुःशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता गँगचा कहर दिसून आला आहे. बारीक अंगकाठी असण्याऱ्या दोन तरुणांनी फक्त २०० रुपयांसाठी थेट कोयतंच काढला. हा धक्कादायक प्रकार चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. या दोन तरुणांनी काही व्यक्तींकडे २०० रुपयांची मागणी केली होती. मात्र त्या व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिल्याने थेट कोयता उगारला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे इतका गंभीर प्रकार घडूनही चतुःशृंगी पोलिसांनी दाखल घेतली नाही. या प्रकरणात कुणीही तक्रार देण्यासाठी समोर आले नाही. म्हणून गुन्हा नोंदविण्यात नाही आला. त्यामुळे चतुःशृंगी पोलिस एखाद्याची हत्या होण्याची वाट बघताय की काय? असा प्रश्न सध्या तरी सामान्य नागरिकांना पडला आहे.

कोयता गॅंग यांनी पुणे पोलिसांच्या नाकात दम करून ठेवला आहे. रोज हल्ले, केक कापणे, यात धिंड काढल्यानांतर आता पुणे पोलीस यांनी DB ब्रांच आणि विबिट मार्शलला पिस्तूल देण्याचा निर्णय घेत आहे. त्यासाठी या सगळ्यांना खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असं असलं तरीही कोयता गॅंगला रोखणं पोलिसांना मोठा आव्हानात्मक ठरणार आहे. या सगळ्यांना प्रशिक्षण दिल्यावर शहरातील गुन्हेगारी कमी होई का?, कोयता गॅंगला आला असेल का? हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.