एमआयडीसी पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन ; ६ गुन्हेगार ताब्यात

0

जळगाव ;- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी हद्दपार, चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्यांसह स्टॅण्डींग वॉरंट असलेले पाच रेकॉर्डवरील गुन्हेगार मिळून आले. तसेच नाकाबंदी दरम्यान, १३ वाहनांवर कारवाई करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कोम्बिंग ऑपरेश राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाकडून रविवारी रात्री ते राबविण्यात आले. यावेळी दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला उदय रमेश मोची रा. रामेश्वर कॉलनी हा विना परवानगी शहरात मिळून आल्याने मध्यरात्री एक वाजता त्याला मेहरुण परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर घरफोडीच्या उद्देशाने फिरत असलेला राहुल जिवन पांडे रा. सुप्रिम कॉलनी याला मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ताब्यात घेवुन कारवाई करण्यात आली. तर अजय बिरंजु गांरुगे रा. तांबापुरा दोन वर्षापासुन स्टॅण्डिग वॉरट मध्ये फरार होता. त्याला देखील अटक करण्यात आली.

या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आसाराम मनोरे, पोउनि रवींद्र गिरासे, दत्तात्रय पोटे, पोउनि संजयिसग पाटील, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ अनिल तायडे, पोहेकॉ मंगेश बागुल, दिनेश चौधरी, संदीप सपकाळे सचिन पाटील, योगेश बारी, चेतन सोनवणे, सतिष गजें, सिध्देश्वर डापकर, चंद्रकांत पाटील, गणेश वंजारी यांच्या पथकाने केली.

हिस्ट्रीशिटर यांची केली तपासणी

भोला राकेश बांगडे रा. सुप्रिम कॉलनी जळगाव, विशाल भागवत सुरवाडे रा. रायपुर कुसुबा जळगाव, गोलु उर्फ राजकिसन मानसिंग परदेशी रा. रायपुर, कुसुबा, आबा मधुकर पाटील रा. रायपुर, कुसुबा, यांच्या विरुध्द मा. न्यायालयाकडील अजामीन पात्र वॉरन्ट होते. त्याप्रमाणे त्यांना ताब्यात घेवुन कारवाई करण्यात आली होती. तर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील तेरा हिस्ट्रिशीटरांची तपासणी करण्यात आली. तसेच नाकाबंदी दरम्यान, १३ वाहन चालकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ९०० रुपयांचा दंड वसुल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.