जळगावात शिक्षण घेणाऱ्या १० विद्यार्थ्याचे मोबाईल लांबवीले

0

जळगाव ;-बाहेरगावाहून जळगावात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचे १० मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार शाहू नगर येथील सहयोग हौसिंग सोसायटी येथे उघडकीस आला असून याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील शाहू नगर येथील सहयोग हौसिंग सोसायटीत भुषण राजेंद्र ठाकरे रा. वटार ता. चोपडा या तरूणासह इतर सहकारी राहत असून रविवारी २८ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घराचे दरवाजे उघडे ठेवून सर्वजण झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खोलीतून विद्यार्थ्यांचे ७० हजार रूपये‍ किंमतीचे १० मोबाईल चोरून नेल्याचे समोर आले आहे. ही घटना उघडकीला आल्यानंतर सर्वांनी शोधाशोध केली परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर विद्यार्थ्यांनी सोमवारी २९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनिल पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.