हिमालयाच्या पुरात अडकले महाराष्ट्राचे भाविक, ७ पर्यटक अजूनही बेपत्ता

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

हिमालयाच्या पुरामुळे सध्या चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून, हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातले पर्यटक येथे सुट्टीसाठी गेले असता, ते आता पुरामुळे अडकून पडले आहेत. एकूण १७ पर्यटक अडकले असून, त्यापैकी १० जणांशी संपर्क साधण्यात यश आले आहे. मात्र इतर ७ पर्यटक आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये कोणताही संवाद झालेला नसल्याचे समोर येत आहे. आता या पर्यटकांच्या कुटुंबीयांनी पुणे महानगरपालिकांकडे मदत मागितली आहे.

उत्तरेकडील राज्यात सध्या मुसळधार पाऊस आणि पूरग्रस्त स्थिती आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या राज्यांमध्ये जिल्हातील नागरिक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी जातात. ४ ते ९ जुलै दरम्यान चंदिगढहून हिमालयातील मनाली येथे पर्यटनासाठी गेलेल्या १७ जणांच्या नातेवाइकांनी जिल्हा प्रशासनाला कळवले होते, मात्र त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचं कुटुंबीयांनी सांगितले

हिमाचलमध्ये मुसळधार पावसानंतर जनजीवन विस्कळीत झाले आहे. याशिवाय उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, आणि इतर राज्यांमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे झालेल्या या विद्ध्वंसानंतर मदत आणि बचावकार्य सुरु असून एनडीआरएफच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.