महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात विस्ताराच्या हालचालींना वेग, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात (Cabinet) विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) आज दिल्लीत जाणार आहे. दोन्ही नेते एकत्रित जाणार नाहीत. मात्र दिल्लीत गेल्यावर तिथे दोघांची भेट होण्याची शक्यता आहे. दिल्लीत हे दोन्ही नेते भाजपश्रेष्ठींची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. यर दुसरीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार आजच होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांच्या सोमवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत बैठक झाली. पुन्हा मंगळवारी दुपारी अजित पवार यांनी फडणवीस यांची भेट घेताली. या भेटीगाठींमध्ये खातेवाटपावर सहमत होऊ शकलेली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एन्ट्रीने शिवसेना-भाजप खातेवाटपाची समीकरणं बिघडली. जी खाती शिवसेना- भाजपमध्ये जाणार होती, त्यापैकी ९ मंत्री आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचा कोटा कमी झाला आहे. एकूण ४२ पैकी उरलेल्या १४ मंत्रिपदांमध्ये तीनही पक्षांना कसा सामावून घायच असा प्रश्न सद्या पडलेला आहे. राष्ट्रवादीचे सर्व कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे राज्यमंत्रिपदाची अपेक्षा राष्ट्रवादीला असू शकते.

राष्ट्रवादीच्या समावेशामुळे शिवसेना-भाजपमध्ये अस्वस्थता
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झालं, परंतु अद्याप शिवसेना आणि भाजपाचे आमदार मंत्रिमंडळात सामील होण्याची वाट पाहत आहेत. त्यातच राष्ट्रीवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेनेच्या वाट्याला आलेली खाती राष्ट्रवादीसाठी सोड नये, अशी मागणी आमदारांनी केली होती. त्यावर भाजपने मान्य केलेली आणि शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या खात्यांपैकी कोणतंही खाते राष्ट्रवादीला दिलं जाणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.