नागपूर विमानतळ बॉम्बस्फोटाने उडविण्याची धमकी

0

नागपूर : – नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली असून धमकीमध्ये दहशतवाद्याने विमाने स्फोटकाने उडवून देण्याचा इशारा दिला आहे. ही धमकी सोमवारी सकाळी ९:४५ वाजता विमानतळ व्यवस्थापनाला ई-मेलद्वारे देण्यात आली.

बॉम्बच्या धमकीमुळे विमानतळ व्यवस्थापन चिंतेत, तर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. सीआयएसएफ व पोलिसांनी विमानतळावर शोधमोहीम सुरू केली. पण कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. विमानतळावर पोलिसांची १५-१५ ची दोन पथके तैनात केली आहेत. परिसरातील घडामोडींवर पोलिस लक्ष ठेवून आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.