लुधियानातील तीन वृद्ध व्यक्तींच्या हत्येने हादरले पंजाब !

0

लुधियाना – लुधियाना शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातल्या तीन ज्येष्ट नागरीकांची हत्या झाल्याचा प्रकार घडला आहे. चमन लाल (75), त्यांची पत्नी (वय 70) आणि आई (वय 90) असे तीन जण यात मारले गेले आहेत. ही घटना आज सकाळी एका दूधवाल्याच्या लक्षात आली.

त्याने घर ठोठाऊनही घरातून कोणी प्रतिसाद न दिल्याने त्याने या बाबतीत शेजाऱ्यांना कल्पना दिली. नंतर शेजाऱ्यांनी घराच्या भिंतीवर चढून आत प्रवेश केला. त्यावेळी हे तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. चमनलाल यांची चारही मुले परदेशात स्थायिक आहेत. ही हत्या नेमक्‍याकोणत्या कारणासाठी झाली याचा अजून अंदाज आलेला नाही. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पोलिस माहिती मिळवत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.