राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या अनोख्या राजीनाम्याची जळगावात चर्चा

0

जळगाव,;- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करुन शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अनेकांनी राजीनामे देऊन अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले आहे. राष्ट्रवादीच्या अर्बन सेलचे माजी प्रदेश चिटणीस, अर्बन सेल समन्वयक मूवीकोराज कोल्हे यांनी आपल्या पदाचा राजीनामा अनोख्या पध्दतीने दिला आहे.

यात कोल्हे यांनी म्हटले की, “अजित पवार यांनी राज्य सरकारमध्ये सामील होण्याचा घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारा आहे. ज्या तळमळीने दादांनी पक्ष वाढीसाठी आग्रही भूमिका घेतली. मात्र, पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना एकाकी टाकण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात राष्ट्रवादी विद्यार्थी व युवक कॉंग्रेसचे संघटन बांधणीसाठी आम्ही अनेक कार्यक्रम घेतले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव असे नामकरण करण्यासाठी उभारलेला लढा तुम्ही पाठबळ दिल्यानेच यशस्वी झाला. पण, निव्वळ अजितदादांचा समर्थक म्हणून मला पक्षसंघटना बांधणी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. माझ्या सारख्या कार्यकर्त्यांला अखेर पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे  मुवीकोराज कोल्हे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.