तीन ट्रॅक्टर आणि शेतीसाठी लागणारे अवजारे जळून खाक ; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
मुक्ताईनगर;- तालुक्यातील बेलसवाडी येथे गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागून यात सहा गुरांचा होळपळुन मृत्यू झाला. तसेच या आगीत तीन ट्रॅक्टर आणि शेतीसाठी लागणारे अवजारे जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील बेलसवाडी येथे आजा पहाटे उघडकीस आली. या घटनेत शेतकर्याचे लखोर रुपयांचे नुकसान झाले .
बेलसवाडी येथे शेतकरी धनराज प्रजापती यांच्या गुरांच्या गोठ्याला आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ६ गुरांचा होळपळुन मृत्यू झाला आहे, तर तीन गुरे जखमी देखील झाले आहे. तसेच या आगीत तीन ट्रॅक्टर आणि शेतीसाठी लागणारे अवजारे जळून खाक झाली.
ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याला हा मोठा फटका बसला आहे. मध्यरात्री लागलेल्या या आगीमुळे शेतकरी धनराज प्रजापती यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले अंतुरली दूर क्षेत्राचे पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली व स्थानिक नागरिक, अग्निशामक दलाच्या मदतीने आग पहाटेपर्यंत आटोक्यात आणली.