Browsing Category

निधन वार्ता

वत्सलाबाई चौधरी 

जळगाव - भालोद ता.यावल येथील रहिवासी वत्सलाबाई बळीराम चौधरी (८६) यांचे २९ रोजी निधन झाले. त्या जळगाव येथील सेवानिवृत्त पाटबंधारे अभियंता एम.बी.चौधरी व एम जे कॉलेजचे प्रा. पी बी चौधरी यांच्या आई मनजित एम चौधरी यांच्या आजी होत,

राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस याचं निधन

पंढरपूर: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार हणुमंतराव डोळस (वय ५८) यांचं आज मुंबईतील सैफी रुग्णालयात निधन झालं. गेल्या 2 वर्षांपासून ते कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर काही महिन्यांपासून उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती…

लताबाई पाटील

जळगाव - असोदा येथील रहिवासी लताबाई रतिलाल पाटील (७५) यांचे २८ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

सिंधुबाई चौधरी

जळगाव - आव्हाने येथील रहिवासी सिंधुबाई वासुदेव चौधरी (६२) यांचे २८ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे. त्या वासुदेव दत्तात्रय चौधरी यांच्या पत्नी तर नितीन चौधरी यांच्न्या आई होत.

शरद पाटील

जळगाव - शेळगाव येथील रहिवासी शरद त्र्यंबक पाटील (६५) यांचे २8 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे आहेत. ते प्रशांत पाटील यांचे वडील तसेच गोकुळ पाटील यांचे सासरे होत.

बनाबाई शिरसाठ

यावल- तालुक्यातील घोडगाव येथील रहिवासी बनाबाई यशवंत शिरसाठ यांचे निधन झाले. कार्तिक बिल्डींग मटेरीअलचे संचालक रामकृष्ण यशवंत शिरसाठ यांच्या त्या आई होत.

शैलजा पाठक

भुसावळ - येथील सावरकर रोडवरील म्युनिसिपल पार्क भागातील रहिवासी शैलजा शरदचंद पाठक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. हुडकोमधील रहिवासी चंद्रशेखर पाठक यांच्या वाहिनी तर अजय अभय पाठक यांच्या त्या मातोश्री होत.

खेमचंद वारके

यावल - तालुक्यातील न्हावी येथील रहिवासी खेमचंद रावजी वारके (७२) यांचे रविवारी निधन झाले. किरण व छगन खेमचंद वारके यांचे ते वडील होत.

नवल वाघ

चोपडा - येथील पाटीलगढी भागातील रहिवासी तथा यावल न्यायालयातील लिपिक नवल नीलकंठ वाघ (५१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नितीन वाघ व आकाश वाघ यांचे ते वडील होत.

ग.स.सोसायटीचे माजी चेअरमन अप्पासाहेब पवार यांचे निधन

पारोळा :- ग.स.सोसायटीचे माजी चेअरमन व शिक्षकनेते अप्पासाहेब हनुमंतराव पवार यांचे आज सकाळी ७.०० वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सोमवारी सायंकाळी ५-०० वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. अंत्यसंस्कार पारोळा तालुक्यातील…

सर्फराज तडवी

सावदा- येथील तडवी वाड्यातील रहिवासी सर्फराज सुपडू तडवी (42) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पालिकेचे निवृत्त कर्मचारी सुपडू तडवी यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होत.

दुर्गादास बारी

भुसावळ - येथील रहिवासी व रेल्वेतील निवृत्त अधीक्षक दुर्गादास देवराम बारी (76) यांचे मुंबई येथे निधन झाले. संदीप व प्रदीप बारी यांचे ते वडील होत.

चुडामन पाटील

रावेर *- तालुक्यातील रोझोदा येथील रहिवासी चुडामण देवराम पाटील (72) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. बंडू व तुषार पाटील यांचे ते वडिल होत.

यादवराव पाटील

एरंडोल - तालुक्यातील रवंजे येथील मूळ रहिवासी तथा रेल्वेचे निवृत्त कर्मचारी यादवराव मांगो पाटील (90) यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. विखरण (ता.एरंडोल) येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.वाय.पाटील व परिवहन महामंडळाचे…

सुकलाल महाजन

जळगाव - प्रिंपाळा उपरगरातील रहिवासी निवृत्त ग्रामविस्तार अधिकारी सुकलाल नामदेव महाजन (78) यांचे अल्पशा आजराने निधन झाले. सहाय्यक सरकारी वकील वैशाली महाजन यांचे ते वडील होत. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, जावई, मुलगा, सुना, नातवंडे असा…

जानकीबाई कुकरेजा

जळगाव - येथील गणपती नगरातील रहिवासी जानकीबाई चेतनदास कुकरेजा (76) यांचे निधन झाले. नवरंग चहा चे श्याम व विजय कुकरेजा यांच्या मातोश्री तर अमर, मनोज व मुकेश कुकरेजा यांच्या त्या काकू होत.

नारायण पाटील

जळगाव - जुने भगवान नगरातील रहिवासी तसेच हटकर समाज मंडळाचे संस्थापक, जिल्हा न्यायायाचे निवृत्त कर्मचारी नारायण सुपडू पाटील (82) यांचे निधन झाले. रावेर न्यायालयाचे कर्मचारी सुभाष पाटील यांचे ते वडील होत.

भिला कोळी

डांभूर्णी, ता.यावल - येथील रहिवासी भिला देवचंद कोळी (79) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. संजय कोळी यांचे ते वडील होत.

मधूकर चौधरी

जळगाव - सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधूकर लहानू चौधरी (67) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते देवेंद्र चौधरी यांचे वडिल होत.

नलीनी कुलकर्णी

जळगाव - न्यू लक्ष्मीनगर येथील रहिवासी नलीनी काशिनाथ कुलकर्णी (76) लंदबीम 23 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्या जिल्हा रुग्णालयातील कक्ष सेवक किशोर कुलकर्णी यांच्या आई होत.

कल्पना किरंगे

यावल - तालुक्यातील हिंगोणा येथील झुंजार चौकातील रहिवासी कल्पना प्रकाश किरंगे (५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सचिन किरंगे यांच्या त्या मातोश्री होत.

वसंत माळी 

यावल- येथील महाजन गल्लीतील रहिवासी वसंत नत्थू माळी (६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्याम्गे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भाजीपाला व्यापारी उमाकांत माळी यांचे ते वडील होत,

अर्जुन सपकाळे 

भुसावळ - येथील तापीनगर भागातील रहिवासी अर्जुन वाटू सपकाळे (७९) यांचे निधन झाले. कासवा (ता.यावल) येथील माजी सरपंच दशरथ सपकाळे व गोकुळ सपकाळे यांचे ते वडील होत.

रत्नाबाई गोसावी

चोपडा - तालुक्यातील सनपुले येथील मूळ रहिवासी व चोपडा येथील अरुणोदय कॉलनीतील रहिवासी रत्नाबाई आनंदगिर गोसावी (६७) यांचे अल्पशाआजाराने निधन झाले. किशोर गोसावी व प्रफुल्ल गोसावी यांच्या त्या मातोश्री होत,

मंडाबाई कोळी

यावल- तालुक्यातील मनवेल येथील रहिवासी मंडाबाई नामदेव कोळी (९९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. चोपडा येथील पालिका सेवानिवृत्त पाणीपुरवठा कर्मचारी केशरसिंग कोळी, मच्छीद्र कोळी व गोरख कोळी यांच्या मातोश्री तर दगडी येथील पोलीसपाटील विठ्ठल कोळी,…

रामदास नरवाडे

विवरे बु., ता रावेर - येथील रहिवासी रामदास गोविंदा नरवाडे (८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. जिरेमाळी समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष, भाजप तालुका सरचिटणीस वासुदेव नरवाडे व गोवर्धन नरवाडे यांचे वडील तर सुरज नरवाडे यांचे ते आजोबा होत.

निर्मलाबाई पाटील

अडावद - सनपुले (ता.चोपडा) येथील रहिवासी निर्मलाबाई काशिनाथ पाटील (६५) यांचे नुकतेच अल्पशाआजाराने निधन झाले. चंद्रकांत पाटील, अशोक पाटील यांच्या भावजयी तर सुनील पाटील, गणेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

प्रेमचंद रडे

जळगाव :- भादली बुद्रुक येथील रहिवासी प्रेमचंद नेमचंद रडे (७८) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. प्रेमकिरण टायर्सचे नितीन व सुहास रडे यांचे ते वडील होत.

धोडाबाई राउत

जामनेर - तालुक्यातील पहूर-कसबे येथील धोंडाबाई वना राउत यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पाणी फौंडेशनचे सुदाम राउत यांच्या मावशी तर नुकुल नारायण जाधव यांच्या त्या भगिनी होत.

डिगंबर पाटील

पिंपळगाव हरेश्वर - चिंचपूरे (ता.पाचोरा) येथील रहिवासी तथा शिंदाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे माजी शिक्षक दिगंबर महादू पाटील (७७) यांचे निधन झाले. चिंचपूरे येथील प्रगतशील शेतकरी प्रवीण पाटील यांचे ते वडील होत.

सिंधुबाई चौधरी

जळगाव - जुनाखेडी रोडवरील योगेश्वरनगर येथील रहिवासी सिंधुबाई भागवत चौधरी (७८ मूळ रा.कडगाव) यांचे १८ रोजी निधन झाले. त्या ला.ना.विद्यालयाचे शिक्षक लक्ष्मण भिकारी नारखेडे व प्रकाश जंगलू कावळे यांच्या सासू होत.

निवृत्त पाटील

वरणगाव :- कांडवेल (ता.रावेर) येथील रहिवासी निवृत्त उखर्डू पाटील (८२) यांचे १७ रोजी निधन झाले. प्रल्हाद पाटील आणि भगवान पाटील यांचे ते वडील होत.

पंडित सुरवाडे

भुसावळ - निंभोरा बुद्रुक येथील रहिवासी दीपनगर वीजनिर्मिती केंद्राचे निवृत्त कर्मचारी पंडित रामदास सुरवाडे (६५, मूळ रा.जाडगाव) यांचे निधन झाले. वीज कंपनीचे कर्मचारी मोहन सुरवाडे व अमोल सुरवाडे यांचे ते वडील होत.

संजय सावळे

जळगाव - बॉम्बे डाईंग येथील रहिवासी व सपोनि संजय जगन्नाथ सावळे (५६) यांचे १७ रोजी निधन झाले. ते पोलीस कॉन्स्टेबल किरण सावळे व अमोल सावळे यांचे वडील होत.

शांताराम सैतवाल

जळगाव - जळगाव खुर्द येथील ज्येष्ठ नागरिक शांताराम ओंकार सैतवाल (८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली, जावई, नातवंडे, पतवंडे, एक भाऊ असा मोठा परिवार आहे,

चंद्राबाई कोळी

जळगाव - भगवाननगर अ.हौ.सोसायटीमधील रहिवासी चंद्राबाई बंडू कोळी (९६) यांचे १७ रोजी निधन झाले. त्या संतोष तायडे त्यांच्या मावशी तथा एम.एस.ई.बी.चे मनोज कोळी यांच्या आजी होत.

शांताबाई वाघ

धुळे - येथील चंदननगरमधील रहिवासी शांताबाई प्रल्हादराव वाघ (७४) यांचे अल्पआजाराने निधन झाले. येथील जे.आर.सिटी हायस्कूलचे शिक्षक सुनील वाघ यांच्या त्या मातोश्री होत.

सुनील महाजन

पाचोरा - येथील विवेकानंद नगरातील रहिवासी व गो.से.हायस्कूलमधील तांत्रिक विभागाचे कर्मचारी सुनील भगवान महाजन (५७) यांचे अल्प आजाराने निधन झाले. चेतन व सागर महाजन यांचे ते वडील होत.

ईश्वर सपकाळे

चोपडा - तालुक्यातील चुंचाळे येथील रहिवासी व जिल्हा परिषद गरताड शाळेतील शिक्षक ईश्वर श्रीराम सपकाळे (५३) यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाले. श्रीराम सपकाळे यांचे चिरंजीव तर माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सपकाळे यांचे ते पुतणे होते.

रुपचंद पाटील

चोपडा - तालुक्यातील चांदसणी येथील रहिवासी रुपचंद वेडू पाटील (७०) यांचे जळगावमध्ये उपचार घेत असतांना हृदयविकाराने निधन झाले.

अनुसयाबाई लाड

रावेर- येथील शिवाजी चौकातील रहिवासी अनुसयाबाई अन्हेयालाल लाड (बारी) यांचे अल्प आजारामुळे निधन झाले. येथील फोटोग्राफर गजानन बारी यांच्या त्या मातोश्री होत.

पुंडलिक राव कंखरे

चोपडा - तालुक्यातील चौगाव येथील रहिवासी पुंडलिक राव कंखरे (७७) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे चार मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

लालसिंग सिसोदिया

भुसावळ - निमगाव ता. यावल येथील रहिवासी लालसिंग सबळसिंग सिसोदिया (८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. जिल्हा बँकेच्या अंजाळा येथील शाखेचे व्यवस्थापक दिलीप पाटील व महेंद्र पाटील यांचे ते वडील होत.

कडू भोई

रावेर :- तालुक्यातील तांदलवाडी येथील रहिवासी कडू देवराम भोई (७४) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. येथील सुरेश भोई यांचे ते वडील होत.

रामचंद्र नेमाडे

यावल - तालुक्यातील न्हावी येथील प्रगतशील शेतकरी रामचंद्र घाम चोपडे (८५) यांचे १२ रोजी निधन झाले. पोपट चोपडे यांचे ते वडील होत.

तेजस पटेल

चोपडा - कुसुंबा (ता.चोपडा) येथील रहिवासी व पुणे येथील संगणक अभियंता तेजस राजेंद्र पटेल (२६) यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. अवघ्या साडेतीन महिन्यांपूर्वी वरखेडी(ता.जि.धुळ) येथील राजश्री पटेल हिच्याशी त्यांचा विवाह झाला होता.

सिंधुबाई बडगुजर

यावल - तालुक्यातील सकाळी येथील शनिपेठ भागातील रहिवासी सिंधुबाई यादव बडगुजर (८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. प्रकाश व जीवन यादव बडगुजर यांच्या त्या मातोश्री होत.

दत्तात्रय शेटे-भालेराव

जळगाव - कांचननगर परिसरातील चौघुले प्लॉटमधील रहिवासी दत्तात्रय बाबुराव शेटे-भालेराव (६१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, निलेश, उमेश, महेश शेटे-भालेराव यांचे ते वडील होत.

भवरलाल कोचर

जळगाव :- येथील न्यू जोशी कॉलनीतील रहिवासी भवरलाल कोचर (८८) यांचे निधन झाले. विनोद व प्रवीण कोचर यांचे वडील तर राहुल कोचर यांचे ते आजोबा होत.

मंजुषा नाईक

जळगाव - नवीपेठेतील रहिवासी मंजुषा नाईक (४६) यांचे १२ रोजी निधन झाले. बाळासाहेब नाईक यांच्या त्या पत्नी तर कौस्तुभ नाईक यांच्या त्या आई होत.

भगवान मराठे

नशिराबाद - येथील रहिवासी भगवान श्रावण मराठे (६२) यांचे १२ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, तीन भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. ते नरेंद्र मराठे यांचे वडील होत.

भागवत बावस्कर

कुऱ्हे पानाचे - येथील रहिवासी भागवत गोविंदा बावस्कर (६२) यांचे निधन झाले. मनोज व गणेश बावस्कर यांचे ते वडील होत.

लीलाबाई पाटील

अडावद, ता.रावेर - उंटावद येथील लीलाबाई दगडू पाटील (७०) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. संतोष पाटील व जगन्नाथ यांच्या त्या मातोश्री होत.

नाना पाटील

अमळनेर - कुंटे रोडवरील रहिवासी व वर्षा मर्चींग सेंटरचे मालक नाना नारायण पाटील (५८) यांचे हृदयविकाराने निधन झाले.प्रमोद पाटील यांचे ते वडील होत.

रमेश महाजन

वरणगाव - येथील रहिवासी रमेश दामोदर महाजन (७१) यांचे निधन झाले. पार्थ मोटर्सचे संचालक सचिन व पियुष महाजन यांचे ते वडील होत.

अनुसयाबाई पाटील

भुसावळ - येथील खडका रोड भागातील रहिवासी अनुसयाबाई आत्माराम पाटील (८२) यांचे निधन झाले. दुध विक्रेते कृष्णा पाटील व के नारखेडे विद्यालयाच्या संगणकीय विभागाचे प्रमुख भगवान पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

लहू पाटील

भुसावळ :- येथील रहिवासी लहू सोमा पाटील (८४) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. सागर व दत्त मेडिकलचे संचालक सतीश पाटील व जगदीश पाटील यांचे ते वडील होत.

गोपाल कोळी

खिर्डी बु., ता रावेर :- येथील रहिवासी तथा माजी कोतवाल गोपाल रामचंद्र कोळी (८१) यांचे अल्प आजाराने निधन झाले. किशोर कोळी व खिर्डी येथील कोतवाल अनंत कोळी यांचे ते वडील होत.

सुशीलाबाई खैरनार

जळगाव - मोहननगर येथील रहिव्सी सुशीलाबाई कालिदास खैरनार यांचे निधन झाले. त्या चैतन्य व प्रवीण खैरनार यांच्या मातोश्री होत.

माधव पाटील

अडावद, ता.चोपडा :- तालुक्यातील खर्डी येथील माधव दोधू पाटील (७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. श्रीराम पाटील यांचे ते बंधू तर विनोद पाटील यांचे ते काका होत.

मुक्ताबाई पाटील

कुसुंबा - येथील मुक्ताबाई रामभाऊ पाटील (९०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले, येथील रुग्णसेवक व सामाम्जिक कार्यकर्ते विनायक रामभाऊ पाटील (सूर्यवंशी) व पुणे येथील खानदेश मराठा महासंघाचे अध्यक्ष भिकन दयाराम पाटील यांच्या मातोश्री तर अष्टविनायक…

भाऊ (धर्म निस्ताने

चाळीसगाव - येथील गुणे अल्लीतील रहिवासी तथा गवळी समाजाचे जात पंच भाऊ उर्फ धर्म जाणू निस्ताने (६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ओम कॉम्प्युटर सेंटर चे संचालक सुभाष व विजय निस्ताने यांचे ते वडील होत.

जाईबाई इंगळे

न्हावी- येथील स्वामीनारायण मंदिराजवळील रहिवासी जाईबाई गिरीधर इंगळे (९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. शिक्षक बी.जी.इंगळे व युवराज इंगळे यांच्या त्या मातोश्री होत.

राजेंद्र महाजन

फैजपूर - येथील शिवाजीनगरमधील रहिवासी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचारी रांजेंद्र मुरलीधर महाजन (५७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. चंद्रशेखर व संजय महाजन यांचे बंधू तर निखील महाजन यांचे ते वडील होत.

बाबुराव चौधरी

जळगाव - नशिराबाद येथील रहिवासी बाबुराव वामन चौधरी (७९) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे, उमेश चौधरी यांचे ते वडील होत.

सुभाषचंद्र भदादा

जळगाव - येथील पिंप्राळा परिसरातील निसर्ग कॉलनीतील रहिवासी सुभाषचंद्र शिवनारायण भदादा यांचे निधन झाले. नरेंद्र भदादा यांचे ते वडील होत.

मनकर्नाबाई पाटील

भादली खुर्द, ता जळगाव - येथील मनकर्नाबाई आत्माराम पाटील यांचे १० रोजी निधन झाले. कमलाकर व सुभाष पाटील यांच्या मातोश्री होत,

लीलाबाई वाणी

जळगाव - लीलाबाई शिवलाल वाणी (७०) यांचे १० रोजी निधन झाले. त्याच्या पश्चात सात मुले, दोन मुलीम सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या राजेंद्र न्यूज पेपर एजन्सीचे राजेंद्र वाणी, शंकर वाणी यांच्या मातोश्री होत.