राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस याचं निधन

0

पंढरपूर: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार हणुमंतराव डोळस (वय ५८) यांचं आज मुंबईतील सैफी रुग्णालयात निधन झालं. गेल्या 2 वर्षांपासून ते कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर काही महिन्यांपासून उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली आणि आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी 10 वाजता दसूर तालुका माळशिरस येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्यावर विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या जागी २००९ मध्ये डोळस यानी पहिल्यांदा निवडणूक लढवली. २०१४ मध्येही डोळस मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यांनी चर्मकार महामंडळ आणि म्हाडाचे अध्यक्ष म्हणून काही वर्षे काम केले होते. माळशिरस तालुक्यातील दसूर हे डोळस यांचे मूळ गाव असून त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, एक भाऊ व चार बहिणी असा परिवार आहे. मोहिते-पाटील यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या डोळस यांच्या अकाली निधनानं मोहिते गटाला धक्का बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.