प्रीती झिंटाच्या एक्स बॉयफ्रेंडला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

0

टोकियो – प्रसिद्ध उद्योजक नसली वाडिया यांचा पुत्र नेस वाडिया याला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जपानमधील सपोरो न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अभिनेत्री प्रीती झिंटाचा एके काळचा बॉयफ्रेंड असलेला नेस वाडिया आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाब क्रिकेट संघाचा सहमालक आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

वाडिया ग्रुप हा देशातील सर्वात जुन्या बिसिनेस ग्रुपपैकी एक आहे. या ग्रुपच्या संचालक कुटुंबातील नेस वाडिया हा महत्वाचा सदस्य आहे. नेस वाडिया २० मार्चपूर्वी जपानमध्ये पोलिसांच्या ताब्यात होता. त्यानंतर जामीन मिळवून तो भारतात आला. आपण खासगी वापरासाठी अंमली पदार्थ जवळ बाळगल्याचे कबूल केले होते.

सन २०२० मध्ये टोकियो शहरात ऑलिम्पिकचे आयोजन होत आहे. . या स्पर्धांसाठी अमली पदार्थविरोधी मोहीम अधिक कडक करण्यात आली आहे. यामुळे नेस वाडियाला अटक करून त्याला तत्काळ शिक्षा सुनावण्यात आली. या बातमीमुळे वाडिया समूहातील कंपन्यांचे समभाग काही प्रमाणात कोसळले आहेत. बॉम्बे डाईंगचे समभाग १७. ३ टक्क्यांनी घसरले आणि बॉम्बे बर्माचे समभाग ६ टक्क्यांनी घसरले. त्याचप्रमाणे नेस वाडिया यांच्याविरोधात अभिनेत्री प्रीती झिंटा हिने २०१४ साली मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार देखील दाखल केली होती. वाडिया ग्रुपचे अनेक युनिट्स आहेत. ज्यात बॉम्बे डाइंग, बॉम्बे बर्मा ट्रेडिंग, बिस्किटांची विख्यात अशी ब्रिटानिया इंडस्ट्रीज, गोएअर एअरलाइन यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.