संजय राऊतांनी आणखी एक बॉम्ब फोडला

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. संजय राऊत आणि किरीट सोमय्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणं सुरुच आहे. टॉयलेट घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या संजय राऊतांविरोधात तक्रार करण्यासाठी संपूर्ण सोमय्या कुटुंबानं पोलीस ठाणे गाठले होतं. तर आज राऊतांनी सोमय्यांशी संबंधित युवक प्रतिष्ठानवर आरोपांचा नवा बॉम्ब फोडला आहे.

पश्चिम बंगालच्या मेट्रो डेअरीकडून युवक प्रतिष्ठानला लाखो रुपयांचं डोनेशन मिळाल्याचा आरोप संजय राऊतांनी ट्वीट करत केला आहे. तसंच मेट्रो डेअरीची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु असल्याचा दावाही संजय राऊतांनी केला आहे. ते महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त कसा करणार? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे. किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करताना त्यांच्या युवक प्रतिष्ठानला ईडी आणि सीबीआयकडून कसे पैसे मिळतात, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर आरोप करणार एक ट्वीटही केलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “पश्चिम बंगालमध्ये मेट्रो डेअरी म्हणून आहे. त्या मेट्रो डेअरीच्या डिइन्व्हेस्टमेंट प्रक्रियेत गैरव्यवहार झालेले आहेत. त्यासंदर्भात ईडी आणि सीबीआयच्या धाडी पडल्या आहेत. त्यांच्याकडून लाखो रुपये देण्यात असून खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. अशा कंपन्या किरीट सोमय्या यांच्या प्रतिष्ठानला देणग्या कशा देतात? अशा एकूण 172 कंपन्या आहेत.” तसेच, संजय राऊतांनी मेट्रो डेअरीच्या गैरव्यवहारांची कागदपत्र माध्यमांसमोर सादर केली.

त्यावेळी बोलताना, काल हे महाशय तक्रार करायला गेले होते. आमची प्रतिष्ठा गेली याप्रकरणी. हे हिमनगाचं एक टोक आहे. याहीपेक्षा मोठी प्रकरणं बाहेर येतील. भ्रष्टाचार विरोधी असल्याचा मुखवटा घालून हा माणूस गेली अनेक वर्ष उद्योगपती, कंपन्या, व्यापारी बिल्डर्स यांच्याकडून खंडण्या गोळा करतोय, असंही राऊत म्हणाले.

“हे महात्मा किरीट सोमय्या आहेत. जे सतत इतरांच्या भ्रष्टाचाराबाबत बोलत असतात, धमक्या देत असतात. मी गेल्या काही दिवसांपासून त्यांचं जे युवक प्रतिष्ठान आहे, त्या युवक प्रतिष्ठानच्या खात्यामध्ये संशयास्पद देणग्या कशा येतात? देणगीच्या नावाखाली खंडणी गोळा केली जाते. ज्या कंपन्यांवर ईडी, सीबीआय चौकशी आहे. कंपन्यांवर धाडी पडणार आहे किंवा पडताहेत, अशा कंपन्यांकडून हे महाशय देणग्या उचलतात. हा साधा सरळ प्रकार नाही.

ईडी आणि सीबीआयच्या कामाची पद्धत सध्या अशी आहे की, एखाद्या मोठ्या कंपनीवर गैरव्यवहारासंबंधी धाड पडली. तर ज्या ज्या लोकांना या कंपनीच्या माध्यमातून आर्थिक लाभ झाला आहे. त्यांची सुद्धा चौकशी होते, किंवा त्यांना सुद्धा अटक केली जाते. नवाब मलिक यांचं प्रकरण असंच आहे. आमचीही अशीच चौकशी झालेली आहे. आमच्या अनेक सहकाऱ्यांचीही अशीच चौकशी झाली आहे.”, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

.

Leave A Reply

Your email address will not be published.