महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री?; उद्धव ठाकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात सत्ता संघर्ष (Maharashtra Political Crisis) झाल्यांनतर आता उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेतून फुटून गेलेल्या शिंदे गटावर (Shinde Group) उद्धव ठाकरे आक्रमकपणे टीका करत आहेत.

काल एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार असल्याचं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही सांगितलं की मला पुन्हा मुख्यमंत्री करायचं आहे. पण मला मुख्यमंत्री करण्याची गरज नाही. पण माझ्या हक्काचा शिवशक्ती, भीमशक्ती लहुशक्तीचा एक कर्तबगार माणूस मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, आपल्याला मुख्यमंत्रिपदी बसवायचा आहे. हे स्वप्न नुसतं स्वप्न न राहता सत्यात उरवायचं असेल तर तुम्हाला सोबत येऊन वाड्या वस्त्यांमध्ये ही विचारांची मशाल घेऊन जावी लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्यपाल कोश्यारी (Governor Koshyari) आणि मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha)  यांच्यावर जोरदार निशाणा साधत उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हेसुद्धा आता जुने आदर्श वाटू लागले आहे. मुंबईतील एक नेते मंत्री झाले आहेत. त्यांनी आजच्या गद्दारीची तुलना शिवरायांच्या आग्रातून सुटकेशी केली आहे. काय बोलणार याबाबत. छत्रपती शिवाजी महाराज कुठे, आग्रा कुठे? तिकडनं ते कसे सुटले? शिवरायांना सुटकेसाठी भाजपाने मदत केली होती का? शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं नसतं तर तुलना करणारे आज कुर्निसाद करताना दिसले असते, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.