Sunday, January 29, 2023

साकळीत ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी ‘भावी सरपंचाची’ गावभर चर्चा !

- Advertisement -

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

साकळी येथील हंगामी ग्रामपंचायत निवडणूक पूर्वीच गावात ‘ भावी ‘ सरपंचांची चर्चा चांगल्याच रंगू लागलेल्या असून इच्छुक उमेदवार म्हणजेच भावी सरपंचांनी सोशल मीडियावर आपल्या नावाने व्हाट्सअप ग्रुप तयार करून निवडणुकीपूर्वीच मोठा धुरळा उडवण्यास सुरुवात केलेली असल्याचे दिसून आहे.

त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच रंगतदार व चुरशीची होणार असल्याचे चिन्हे दिसून येत आहे.

- Advertisement -

साकळी ग्रामपंचायतीत सध्या अस्तित्वात असलेल्या कार्यकारणीचा मागील निवडणुकीच्या कालावधीनुसार डिसेंबर २०२२ ला पंचवार्षिक कार्यकाळ संपत आहे. तर प्रत्यक्षात या कार्यकारिणीने दि. ५ फेब्रुवारी २०१८ पदभार घेतलेला होता. त्या अनुषंगाने नवीन निवडणूक होऊन नवीन कार्यकारणी अस्तित्वात घेणे गरजेचे आहे. त्या अंदाजे येत्या डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारी महिन्यात ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम लागू शकतो असा अंदाज आहे. या हंगामी निवडणुकीच्या निमित्ताने गावात राजकीय चर्चांना व घडामोडींना वेग येत आहे. कट्टया- कट्ट्यांवर ‘चाय पे चर्चा’ रंगत आहे. एकूणच निवडणूक पूर्व राजकीय वातावरण चांगलेच तापत असून गावाला निवडणुकीचे वेध लागत आहे.

या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मागील पंचवार्षिकप्रमाणे यावेळी सुद्धा लोकनियुक्त सरपंच निवडला जाणार आहे. तर संपूर्ण गावातून सहा वार्डातून एकूण १७ सदस्य निवडले जाणार आहे.

या निवडणुकीचा एक भाग म्हणून लोकनियुक्त सरपंच पदासाठी सध्या अनेक जण इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. या इच्छुकांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी व प्रभावीपणे आपला प्रचार करण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या नावे ‘भावी सरपंच ‘ म्हणून व्हाट्सअप ग्रुप तयार केलेले आहे. या ग्रुपच्या माध्यमातून आपला जोरदार प्रचार चालविला आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे