दुर्देवी : झुल्याची दोरी गळ्यात अडकून तरुणीचा मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव (Jalgaon) शहरात एक दुर्देवी घटना घडली आहे. घरातील नायलॉनच्या दोरीचा झुला खेळताना झुल्याची दोरी गळ्यात अडकल्याने १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू घटना जळगाव शहरातील महाबळ परिसरात घडली. विधी स्वप्निल पाटील (वय १८ रा. महाबळ, जळगाव) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विधी पाटील ही तरूणी आपल्या आई तेजस्वीनी, वडील स्वप्निल पाटील आणि आजोबा यांच्यासह जळगाव शहरातील महाबळ परिसरात वास्तव्याला होती. ती एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण करीत होती. मंगळवारी 29 नोव्हेंबर रोजी 4 वाजता महाबळ येथील राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर नायलॉन दोरीच्या झोक्यावर बसलेली होती. त्यावेळी घरात कुणीच नसताना झोका घेत असताना अचानक नॉयलॉन दोरीचा विधीच्या गळ्याला फास लागला. मात्र घरात कुणीही नसल्याचे तिचा बचाव करता आला नाही. यामुळे गळफास लागल्याने तिचा मृत्यू झाला.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी विधीला मयत घोषित केले. विधी ही एकुलती एक मुलगी असून तिच्या दुर्देवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.