Wednesday, February 1, 2023

धक्कादायक; जळगावात अजून एक सेक्सटॉर्शनचे प्रकरण… तरुणांनो सावधान पुढचा नंबर तुमचा…

- Advertisement -

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

सध्या सेक्सटॉर्शनच्या (sextortion) घटना वाढल्याचे प्रमाण दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच एक डॉक्टर या जाळ्यात अडकून अश्याच घटनेचे शिकार झाले होते. ते प्रकरण मागे पडत नाही तोच जिल्ह्यात पुन्हा एक तरुण अश्याच घटनेत अडकल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

सविस्तर वृत्त असे की, धरणगावातील एका तरुणाला संबंधित महिलेकडून व्हॉट्सअ‍ॅपव द्वारे संपर्कात येऊन त्यांची मैत्री झाली. त्यामुळे त्यांची जवळीक झाली. पण अचानक संबंधित महिलेने शनिवारी रात्री पीडीत तरुणाला विवस्त्र (न्यूड) अवस्थेत व्हिडीओ कॉल केला. आणि सदर कॉल हा स्क्रीन रेकॉर्ड करून तरुणाकडून खंडणी उकळण्यासाठी मोबाईल वर फोन करून पैशांची मागणी सुरु केली.

परंतु पीडीत तरुणाने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. मात्र यानंतर आरोपी महिलेचे व अन्य एकाचे येणारे कॉल तरुणाला येणे बंद झाल्याचे समजते.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे