धक्कादायक; घरात भारत पाक सामना सुरु होता… अन 3 वर्षीय चिमुरडा पडला होता विहिरीत…

0

 

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

टी-20 वर्ल्डकप दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्या हायव्होल्टेजच्या सामन्याची धुमशान सर्वत्र पसरली होती. (During the T20 World Cup, the hype of the high-voltage match between India and Pakistan was everywhere) मात्र या सामन्याच्या पूर्वसंध्येला जवळपास संपूर्ण देश दंग होता तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये एक मोठी घटना घटना घडल्याचे समोर आले आहे. कोल्हापूरमध्ये एक 3 वर्षी मुलगा विहीरीत बुडत होता. मात्र यावेळी मोठ्या व्यक्तींना जे करता आलं नाही ते एक 15 वर्षीय मुलीने करून दाखवलंय. या चिमुरड्याचे प्राण वाचवण्यात ही मुलगी यशस्वी ठरली आहे.

दानोळीच्या जयसिंगपूरमध्ये कटारे मळ्यात राहण्याऱ्या कटारे कुटुंबात 2 चिमुरडे आहेत. 5 वर्षीय ओजस कटारे आणि 3 वर्षीय शौर्य कटारे अशी त्यांची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी भारत पाकिस्तान सामन्यासाठी सर्वाचं लक्ष टीव्हीकडे असताना ओजस आणि शौर्य विहिरीजवळ खेळत होते. खेळता खेळता अचानक शौर्य विहिरीत पडला. शौर्य विहिरीत बुडत असताना ओजस जोरजोरात आरडा ओरडा करू लागला. त्याठिकाणी कोणीही मोठी व्यक्ती उपस्थित नव्हती. मात्र त्याचं ओरडणं ऐकून सर्वजण धावत विहिरीजवळ पोहोचले. यावेळी वेळ न दडवता 15 वर्षीय नम्रताने थेट विहिरीत कुठे घेतली आणि तीन वर्षाच्या शौर्यला बाहेर काढलं.

नम्रता दानोळीतील हायस्कूलमध्ये शिकत असून ती नववीत आहे. तिच्या या धाडसी कृत्याची माहिती मिळताच दानोळी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रेया वांजोळे आणि अध्यक्ष राजकुमार पारज यांनी तिच्या शौर्याचे कौतुक केलं. शिवाय यावेळी तिचा सत्कारही करण्यात आला. नम्रताने दाखवलेल्या कृत्यामुळे शौर्यचे प्राण वाचले. मुख्य म्हणजे त्या क्षणाला जे भल्याभल्यांना सुचलं नाही ते अवघ्या नववीत शिकणाऱ्या मुलीने करून दाखवलं. तिच्या या धाडसी कृत्याचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय.

Leave A Reply

Your email address will not be published.