शिंदे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात; याचिका केली दाखल

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात अजूनही सत्तासंघर्षांचं (Maharashtra Political Crisis) प्रकरण सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु आहे. अशातच शिंदे गटाने (Shinde Group) सुप्रीम कोर्टात पुन्हा धाव  घेतली आहे. शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) रिट याचिका (writ Petition)दाखल करत केंद्रीय निवडणूक आयोगाची (Central Election Commission) सुनावणी सुरूच ठेवण्याची मागणी केली आहे.

शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करत केंद्रीय निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवावी, निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. तसेच, न्यायलयाने त्वरीत सुनावणी घ्यावी आणि निवडणूक आयोग प्रक्रीयेसंदर्भात निर्णय द्यावा, अशीही विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.

आज शिंदे गटाच्या वतीने वकील न्यायालयात मेन्शनिंग करणार आहेत. दरम्यान आयोगाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 23 सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.