विसर्जनाच्या मिरवणुकीत कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज; निलंबनाची कारवाई करा

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

श्री गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान धानोरा तालुका चोपडा येथे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीमाराचा विश्व हिंदू परिषद बजरंग दल भडगाव, सकल हिंदू समाज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भडगाव यांच्या वतीने आज तीव्र निषेध व्यक्त करत तहसीलदार मुकेश हिवाळे व पोलीस स्टेशन भडगाव यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदनावर डॉ. निलेश पाटील, मिलिंद बोरसे, नाना हाडपे, विजय देशपांडे, साजन पाटील, तुषार शिरसाट, विनोद पाटील, सुनील मांडोळे, मयूर मालपुरे, प्रदीप पाटील, भूषण पाटील, हेमराज पाटील, ॲड. सुनील सोनवणे, नंदकिशोर पाटील आदींनी निवेदनावर स्वाक्षरी केल्या आहेत. घटनेत संबधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करा अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.