मध्यरात्री शिंदे-फडणवीसांची गुप्त बैठक

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काल रात्री सोमवार दि.१४ रोजी मध्यरात्री उशीरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DYCM Devendra Fadnavis) यांची गुप्त बैठक पार पडल्याचे वृत्त आहे.

मध्यरात्री बारा वाजून पन्नास मिनिटांनी ही बैठक संपवून फडणवीस वर्षावरून बाहेर पडताना दिसले. जवळपास दिड ते दोन तास चर्चा झाल्याची माहीती आहे. अनेक गोष्टींवर यावेळी खलबतं झाली आहे. यावेळी कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली, हे मात्र गुलदस्यात आहे.

फडणवीसांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांचीही भेट घेतली होती. त्यांनतर झालेली ही बैठक महत्वपूर्ण असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत मंत्रीमंडळ विस्तार (Cabinet expansion) आणि जितेंद्र आव्हाडांच्या (Jitendra Awhad) प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.