चक्क बसस्थानकातून बस पळवली; तक्रार दाखल

0

बुलडाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बुलडाणा बसस्थानकात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क बुलढाणा बस स्थानकातून बस चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

बसचालक आणि वाहक हे बसस्थानकातील विश्रांती कक्षात झोपले असताना  मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ही बस चालू करून पळवून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्रशासनाची उडाली झोप 

राज्य परिवहन महामंडळाची बस चोरीला गेल्याची घटना (दि.13) रविवारी रात्री बुलढाण्यातील देऊळगाव राजा बस स्थानकात घडली. विश्रांती कक्षात चालक आणि वाहक झोपलेले असताना बस चोरीला गेली. बस स्थानक परिसरातून बस चोरीला गेल्याने प्रशासनाची झोप उडाली. एसटी बस चोरीला गेल्याची तक्रार देऊळगाव पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. अचानक घडलेल्या घटनेने जोरदार चर्चा रंगली आहे.

अखेर सापडली बस 

दरम्यान सर्वत्र शोध घेतल्यानंतर अखेर बस स्थानकापासून दोन किलोमीटरवर बस आढळली. बस सापडल्याने चालक आणि वाहकाचा जीव भांड्यात पडला. सदर बस अज्ञाताने सुरू करून चिखली मार्गाने जाताना बस स्थानकापासून दोन किलोमीटरवर एका गतिरोधकावर बसचा सेंट्रल जॉईंट निखळल्याने नादुरुस्त अवस्थेत बस रस्त्यात उभी करून पोबारा केला आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेऊन हे प्रकरण चौकशी सुरू केली असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.