आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नांना यश; चार कोटींचा निधी मंजूर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव (Jalgaon) शहर हे नावाला शहर आहे कि काय असा प्रश्न सर्वांनाच पडतो. कारण हि तसेच आहे. शहरातील विविध भागांत नागरी सोयीसुविधांचा अभाव आहे. पण आता अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासकामांसाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विकास विभागातर्फे चार कोटी रुपयांचा निधी (Fund) मंजूर करण्यात आला आहे.शासनाच्या सामाजिक न्याय विकास विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar) सामाजिक विकास योजनेंतर्गत शासन निर्णय क्रमांक सावियो-२०२३/प्र.क्र. ७०/अजाक अन्वये जळगाव शहर महारपालिकेतील भागातील विकासकामांसाठी चार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. महापालिका हद्दीतील विविध भागांमध्ये पेव्हर ब्लॉक, बौद्धविहाराचा विकस, आर.सी.सी. गटार, अनेक प्रभागांमधील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण करण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

असं म्हंटले जात आहे या निधीसाठी आमदार सुरेश भोळे (MLA Suresh Bhole) यांनी प्रयत्न केल्याचे सागंण्यात आले. निधी मंजुरीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सहकार्य केले असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.