अनुवाद ही सर्जनशील कलाकृतीच – डॉ.उमा कुलकर्णी

0

 

राजभाषा दिनानिमित्त डॉ.उमा कुलकर्णी यांचा वाचकांसाठी जाहीर संवाद

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क
मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त अखिल भारतीय साहित्य परिषद आणि मूळजी जेठा महाविद्यालय मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिध्द लेखिका आणि कन्नड मराठी साहित्य प्रांतात अनुवादाचा भक्कम सेतू उभारणाऱ्या डॉ.उमा कुलकर्णी यांचे “भारतीय साहित्य आणि अनुवाद विश्व ” या विषयावर सायंकाळी जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी जळगाव शहरातील वाचक, साहित्यिक आणि पत्रकार मंडळींशी लेखिका डॉ.उमा कुलकर्णी यांनी अत्यंत मन -मोकळा संवाद साधला. मू.जे.महाविद्यालयाच्या नवीन कॉन्फरन्स हॉल मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व प्रथम डॉ.उमा कुलकर्णींचे स्वागत स्मृतिचिन्ह,पुष्प गुच्छ,शाल देऊन देवगिरी प्रांत कार्याध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम पाटील यांनी केले. परिचय व संचालन देवगिरी प्रांत मंत्री विजयजी लोहार यांनी केले. सर्व प्रथम 1980पासून आजपर्यंतचा अनुवाद प्रवास त्यांनी उलगडून सांगितला ,चर्चेच्या माध्यमातून त्यांनी सुप्रसिध्द कन्नड साहित्यिक शिवराम कारंथ यांच्या साहित्याचे महत्व सांगत यक्षगान या कला प्रकारचे महत्व सांगितले भैरप्पा विषयी असलेले साहित्यिक बंध अनुबंध सांगितले.कन्नड मधील विविध विचारधारेच्या लेखांचे अनुवाद करतांनां विचार धारे विषयी अत्यंत तटस्थ राहिल्याचे सांगितले.सोन्याचा उंबरा या टी. व्ही. मालिकेविषयी पटकथा लेखनाचे आणि संवाद लेखनाचे रंजक किस्से सांगितले. अनुवादाची समीक्षा करता येत नसल्याचे सांगत वाचकच हा अनुवादाचा खरा समीक्षक असल्याचे सांगितले.

अनुवादकाने रूपांतर वा भाषांतर न करता मूळ कलाकृतीशी प्रामाणिक राहून अनुवाद साधावा आणि हीच माझी अनुवादा विषयीची भूमिका असल्याचे सांगितले.

अनुवाद ही सर्जनशील प्रक्रिया असल्याचे सांगून काश्मीर संदर्भात असलेल्या तरुण कन्नड लेखिका सहना विजय कुमार हिच्या काश्मीर वरील ‘कशीर’ कादंबरी विषयीचे महत्व सांगितले.भैरप्पा यांचे आवरण आणि कशीर ही पुस्तके प्रतेक सुजाण वाचकांनी वाचावीत असे ही आवाहन केले.

या मुक्त संवादात शशिकांत वडोदकर, शरदचंद्र छापेकर, शुभदा कुलकर्णी, चंद्रकांत भंडारी,शामकांत बाविस्कर,डॉ.सुभाष महाले, डॉडॉ.अनिल क्षीरसागर, वैदेही नाखरे, डॉ.उषा शर्मा यांनी क्रियाशील सहभाग नोंदवला.कार्यक्रमास विभाकर कुरंभट्टी, .संगीता चंद्रात्रे, डॉ.मनोज महाजन, रत्नाकर पाटील, हिंदी साहित्यिक सुधीर ओखदे, अनिल अभ्यंकर, डॉ. योगेश महाले, डॉ.विद्या पाटील यांची उपस्थित होती. आभार प्रदर्शन सुहास देशपांडे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.