राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर ?

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रात झालेल्या मोठ्या सत्तासंघर्षाचं (Maharashtra Political Crisis) प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात (Supreme Court) गेली. मात्र  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतची सुनावणी सातत्यानं पुढं ढकलली जात होती. वारंवार तारीख पुढे जात असल्यानं शिवसेनेच्या (Shivsena)  वकिलांनी हे प्रकरण कोर्टात मेन्शन केलं होतं.

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं प्रकरण पटलावर घेण्यास मान्यता दिली. सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा, न्या. हिमा कोहली, न्या. कृष्णमुरारी यांच्याच खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली होती. त्यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलं होतं.

दरम्यान सुप्रीम कोर्टातील ही पुढील सुनावणी २९ ऑगस्टला होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी या प्रकरणावर निकाल देताना हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवलं होतं. त्यानुसार आज सुनावणी होणं अपेक्षित होतं पण ही सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. २९ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.