‘आप’चे अनेक आमदार ‘नॉट रिचेबल’; केजरीवालांचं टेन्शन वाढलं !

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र आणि बिहार नंतर आता सर्वांचं दिल्लीकडे लक्ष लागून आहे.  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज आम आदमी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये 62 पैकी 53 आमदार हजर होते. 9 आमदार बैठकीला आले नाहीत. मात्र केजरीवाल यांनी त्यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे, भाजपने आमच्या 12 आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना 40 आमदार हवे होते, त्यासाठी त्यांनी 40 कोटींची ऑफर दिली, असा आरोप ‘आप’ने केला आहे.

दिल्लीतील ऑपरेशन लोटसवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर आम आदमी पक्षाने (आप) गुरुवारी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे, मात्र बैठकीपूर्वी पक्षाचा अनेक आमदारांशी संपर्क होऊ शकलेला नाही. यामुळे अरविंद केजरीवाल यांचं टेन्शन वाढलं आहे.

आपचे आमदार दिलीप पांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, काल संध्याकाळपासून काही आमदारांशी संपर्क होऊ शकला नाही. आम्ही सतत बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच सर्व आमदार बैठकीला पोहोचतील. आमचे 40 आमदार फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

आम आदमी पक्षाने (आप) बुधवारी पत्रकार परिषद घेतली. आपचे नेते संजय सिंह म्हणाले की, आम्ही ऑपरेशन लोटसबाबत खुलासा केला. ते म्हणाले की, भाजपने आमच्या आमदारांना ऑफर दिली. ‘आप’ सोडल्यास 20 कोटी आणि इतरांना सोबत आणले तर 25 कोटी देऊ, अशी ऑफर होती.

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर गंभीर आरोप केले. नरेंद्र मोदी सरकारच्या ‘साम दाम दंड भेड’चा मी पर्दाफाश करेन, असं संजय सिंह म्हणाले होते. पंतप्रधान कसे दिल्ली सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपचे लोक आमच्या आमदारांना भेटायला येतात. मनीष सिसोदियांसारखे खोटे गुन्हे दाखल करतील, अशी धमकी देतात, असे संजय सिंह म्हणाले होते. आता आमदार फोडण्यासाठी 20 आणि 25 कोटींचे आमिष दिले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.