महाराष्ट्र सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिवसेनेतून शिंदे गटाने बंड करून सत्ता स्थापना केली. या सत्तासंघर्षाची सुनावणी (Power struggle hearing) सुप्रीम कोर्टात सुरु आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरूध्द एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात आता १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असल्याने पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर पडली आहे. शिवसेना (ShivSena) नेमकी कोणाची ? यावरून सुप्रीम कोर्टात उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे गट एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत.

उध्दव ठाकरे यांच्यातर्फे आधीच हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापिठाकडे देण्याची मागणी करण्यात आली असून यावर आता सुप्रीम कोर्ट नेमकं काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आज सकाळी सव्वाअकराच्या सुमारास सुनावणी सुरू झाली. यात सुरुवातीलाच मुख्य न्यायाधीशांनी १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी घ्यावी असे सूचित केले. यामुळे आता पुढील सुनावणी येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.