मंत्री महाजनांचा कट्टर विरोधक नेता भाजपात जाणार ? चर्चेला उधाण

.. तर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात देखील राजकीय घडामोडींना वेग आलाय. लोकसभेच्या निवडणूका तोंडावर असून अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.  राज्यात अनेक मोठे भूकंप होणार असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केला आहे, तर जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते डॉ. उल्हास पाटील व त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यातच आता मंत्री गिरीश महाजन यांचे जामनेर विधानसभा मतदार संघातील कट्टर राजकीय विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) नेता भाजपात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

 

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

जामनेर तालुक्यातील मंत्री गिरीश महाजन यांचे राजकीय कट्टर विरोधक असलेले संजय गरुड भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. आयोध्यातील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित एका शोभायात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) संजयदादा गरुड व मंत्री गिरीश महाजन यांच्यात भेट झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भाजप पक्ष प्रवेशाची चर्चा आहे.

सर्वांचं लक्ष लागून

मात्र यावेळी दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकले नसून याबाबत संजय गरुड आणि गिरीश महाजन यांनी जाहीर केलेले नाही. संजय गरुड हे जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत ते भाजपात लवकरच प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे, यामुळे कदाचित मंत्री महाजन यांनी जामनेर तालुक्यात विरोधक शिल्लक राहणार नसल्याचं सूचक वक्तव्य केले असेल. आता नेमकं याबाबत कोणती नवीन घडामोड होते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.