हरवलेलं आधार कार्ड नेऊ शकता जेल मध्ये, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आधार कार्ड हे भारतातील सर्व भारतातील सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं दस्तऐवज आहे. हे दस्तऐवज अनेक ठिकाणी पडताळणीसाठी वापरलं जात. जर तुमचं आधार कार्ड हरवलं तर ते चुकीच्या हातात जाऊ शकते. त्याचा वापर फसवणुकीसाठीही होऊ शकतो.

आधार बायोमेट्रिक डेटाचा गैरवापर फसवे आर्थिक व्यवहार करण्यासाठी, मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो. हे ओळख चोरी करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. अशा परिस्थितीत आधार कार्डचा गैरवापर टाळणं गरजेचं आहे. यासाठी आधार कार्ड लॉक करण्याची सुविधा भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने प्रदान केली आहे. तुमचे आधार लॉक होताच, हे प्रमाणीकरण प्रक्रियेसाठी वापरल जाऊ शकत नाही.

आधार लॉक आणि अनलॉक म्हणजे काय
आधार कार्ड लॉक करून, नागरिक घोटाळेबाजांना बायोमेट्रिक्स, UID, UID टोकन आणि OTP साठी VID सारख्या कोणत्याही प्रकारच्या प्रमाणीकरणासाठी आधार कार्ड वापरण्यापासून रोखू शकतात. जर तुम्हाला आधार कार्ड मिळाले किंवा तुम्हाला नवीन आधार कार्ड मिळाले. त्यामुळं तुम्ही UIDAI वेबसाइट किंवा mAadhaar अॅपद्वारे तुमचा UID अनलॉक करू शकता. UID अनलॉक केल्यानंतर तुम्ही UID, UID टोकन आणि VID वापरून प्रमाणीकरण पुन्हा सुरू करू शकाल.

आधार कार्ड ऑनलाइन लॉक करण्याच्या पायऱ्या
सर्व प्रथम वेबसाईड https://uidai.gov.in/ वर जा. यानंतर My Aadhaar वरील टॅबवर क्लिक करा. यानंतर, आधार सेवा विभागात जा आणि ‘आधार लॉक/अनलॉक’ वर क्लिक करा. त्यानंतर ‘लॉक यूआयडी’ पर्याय निवड. आता तुमचा आधार क्रमांक, पूर्ण नाव आणि पिन कोड टाका. त्यानंतर ‘ओटीपी पाठवा’ बटणावर क्लिक करा. त्यानंतर, प्राप्त झालेला ओटीपी तेथे भरा आणि नंतर सबमिट करा. या प्रक्रियेद्वारे आधार कार्डही अनलॉक करता येते.

Leave A Reply

Your email address will not be published.