जळगाव शहर विकासाचा भाजपकडून सत्त्यानाश

0

एकेकाळी जळगाव शहराचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अग्रेसर होते. चकचकीत रस्ते, 17 मजली पालिकेची प्रशासकीय इमारत, पालिकेच्या मालकीची भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स, शहराची स्वच्छता, नागरिकांच्या आरोग्याची सेवा, नियमित पिण्याचे पाणी, रस्त्यावर लखलखणारे सार्वजनिक विजेचे दिवे, सुंदर जळगाव स्वच्छ जळगाव ही संकल्पना राबविण्यात येत होती. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे नेतृत्वात शहराचा गाडा हाकला जात होता. देशभरातील नगरपालिकेचे पदाधिकारी जळगाव येथे येऊन शहराची पहाणी करीत होते. आपल्या शहरात जळगावसारखी अंमलबजावणी अनेक शहरात केली गेली.

नगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्याची बाब म्हणून शॉपिंग कॉम्प्लेक्सकडे पाहिले तर जायचेच तथापि शहरातील व्यापार उद्दीम वाढ होऊन अनेकांना रोजगार उपलब्ध होतो ही बाब सुध्दा तितकीच महत्वाची आहे. सुरेशदादांचे नेतृत्व गेले भाजपच्या हाती. शहराची सत्ता आली आणि भाजपने शहरविकासाचा सत्यानाश केला, असा आरोप जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काल पत्रकारांशी बोलतांना केली. जळगाव शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडी शासनाकडून 56 कोटी रूपयांचा निधी मिळत असून त्या विकास निधीच्या प्रस्तावास महापालिकेत नगरसेवकांकडून मंजुरी दिली पाहिजे. परंतु महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकाकडून त्याला विरोध करण्याचे घाटत आहे.

एकतर भाजपची महापालिकेत निर्विवाद सत्ता असतांना त्याचबरोबर राज्याचे भाजपचे मुख्यमंत्री असतांना आणि भाजपाचेच पालकमंत्री असतांना शहर विकासाचा सत्यानाश केला गेला. 100 कोटी रूपये जळगाव शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्याचा बोलबाला झाला तथापि ते 100 कोटी रूपये गेले कुठे? याचे उत्तर मात्र मिळत नाही. जळगाव शहराचे नाव धुळगाव ठेवले जात आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी आम्ही मास्क वापरतो तथापि जळगाव शहरातील नागरिकांना कोरोनाची भीती वाटते पण शहरातील धुळीचे भिती जास्त वाटते. आपल्या सर्वांच्या दृष्टीने ही बाब नामुष्कीची आहे, अशी कबुली पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी दिली.

आता जळगाव महानगरपालिकेतील सर्वच नगरसेवकांना वाटते की, आपल्या प्रभागात विकास कामे झाली पाहिजेत. त्यासाठी 56 कोटी रूपयांच्या विकास निधीच्या प्रस्तावाच्या बाजूने ठराव मंजूर व्हावा म्हणून भाजपाचील काही नगरसेवक शिवसेनेच प्रवेश केला आहे. आता 77 नगरसेवकांची संख्या असलेल्या महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेच्या बाजूने एकूण 44 नगरसेवकांची संख्या झाली आहे. सर्वांना विकास हवा आहे. परंतु विकास झाला तर भाजपचे राजकारण संपते म्हणून विकास कामांनाच विरोध करायचा हा प्रकार भाजपाच्याच राजकारणात बघायला मिळते. तथापि जळगाव शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून काही निधी मंजूर करण्यात आला. त्याचा परिणाम शहरातील विविध भागात रस्त्याची तसेच विकासाची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे भाजपच्या पोटात दुखायला लागले आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे म्हणणे आहे.

विकास कामे करतांना तो कोणत्या पक्षाचा, कोणत्या जातीचा धर्माचा याचा विचार महाविकास आघाडी बिलकूल करीत नाही. माणुसकीचा विचार विकासकामे असतात त्यामुळे कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी विकासकामात केली जात नाही. असे पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी स्पष्ट केले. विकासकामात अडथळा निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही गुलाबरावांनी स्पष्ट केले. भाजप हा पक्ष विरोधासाठी विरोध करतोय हे वरपासून खालपर्यंत स्पष्ट दिसून येते. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. ऐरणीचा मुद्दा ठरणार आहे. जिल्हा परिषदेच्या विकास निधी ग्रामीण भागातील विकासावर खर्च न होता तो निधी परत जातोय. सक्षम लोकप्रतिनिधींसाठी ही नामुष्कीचीच बाब म्हणावी लागेल. त्यातच जिल्हापरिषदेत 10 जागा वाढल्या आहेत. 67 ऐवजी आता 77 जि.प. सदस्यांची संख्या होणार आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या जागासुध्दा 154 इतक्या झालेल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना जिल्हा परिषदेत आपली सत्ता प्राप्त करण्यासाठी नाकीनऊ येणार आहे हे विसरता कामा नये.

Leave A Reply

Your email address will not be published.