मोठी बातमी ! यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नाही

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दसरा मेळाव्यावरून शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात (Shinde Group) चांगलीच जुंपली आहे. हा वाद थेट उच्च न्यायालयापर्यंत पोहोचली असताना दुसरीकडे मुंबई पालिकेनेच (Mumbai Municipal Corporation) यासंदर्भात मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. यंदा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) होणार नाही.

मुंबई महानगर पालिकेनं एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना या दोन्ही बाजूंना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या अभिप्रायाच्या आधारे ही परवानगी नाकारण्यात आल्याचं पालिकेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रातून दिसून येत आहे.

दोन्ही परस्परविरोधी अर्जदारांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळण्यासाठी अर्ज केले. मात्र, कोणत्याही एका अर्जदाराला त्यासाठी परवानगी दिल्यास त्यातून शिवाजी पार्कच्या संवेदनशील परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.