ब्रेकिंग : ATS ने जळगावातून एकाला घेतले ताब्यात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील मेहरूण परिसरातून अकोला दहशतवाद विरोधी पथकच्या (एटीएस) पथकाने आज पहाटे चार वाजेच्या सुमारास एकाला ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पीएफआयशी संबंधित

ताब्यात घेतलेला व्यक्ती जालना येथील असून तो काही दिवसांपासून जळगावात लपून बसलेला होता. अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन (वय 32 , रा. रेहमान गंज वरुन अपार्टमेंट, जालना) असे सदर व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मुंबई गु.र.नं. 21/2022 कलम 121-A, 153-A, 120-ब, 109 भा.द.वि.सहकलम 13(1) (ब) UAP ACT प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच हा व्यक्ती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे.

हे देखील वाचा :

दहशतवाद्यांना मदत, PFI संघटनेवर ED आणि NIA चे छापे

मेहरूण परिसरातून ताब्यात 

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) देशभरात छापेमारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील पुणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगावसह इतर ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे जळगावमधील मेहरूण परिसरातून अकोला एटीएसने तिघांना ताब्यात घेतले होते. एका मशीद जवळ झोपलेले असतांना तिघांना ताब्यात घेण्यात आले. परंतू यापैकी दोघांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.