शिवसेनेच्या 12 खासदारांनी घेतली CM शिंदेंची भेट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात सध्या रोज नवीन राजकीय घडामोडी होत आहेत.  शिवसेनेचे खासदारही पक्षाविरोधात भूमिका घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान  मध्यरात्रीपासून दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी १२ खासदारांनी भेट घेतली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी रात्री उशिरा राजधानी नवी दिल्लीत (New Delhi) दाखल झाले. यावेळी त्यांनी खासदारांबाबतही मोठं विधान केल होतं. शिवसेनेचे फक्त 14 नव्हे तर 18 खासदार आपलेच आहेत. असे म्हटले होते. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. आमच्याकडे बहुमत असून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आमच्या बाजूने निकाल येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेमध्ये आमदारांना फोडून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेला एकपाठोपाठ एक धक्के मिळत आहेत. शिंदे गटाला मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवसनेचे तब्बल 12 खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. अशी जोरदार चर्चा सुरु आहे.

शिंदे गटात सामील झालेले खासदार

हेमंत गोडसे – शिवसेना, राजेंद्र गावित – पालघर, धैर्यशील माने – हातकणंगले, संजय मंडलिक – कोल्हापूर, सदाशीव लोखंडे – शिर्डी, भावना गवळी- यवतमाळ-वाशिम, राहुल शेवाळे – मुंबई दक्षिण मध्य, श्रीरंग बारणे – मावळ, श्रीकांत शिंदे – कल्याण, प्रतापराव जाधव – बुलढाणा, कृपाल तुमाने – रामटेक, हेमंत पाटील – हिंगोली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.