शिंदेंचा शिवसेनेला धक्का ! वरुण सरदेसाईंची युवासेनेतून हकालपट्टी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपचा पाठींबा मिळवत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेला लागोपाठ धक्के बसत आहेत. त्यातच एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेला मोठा झटका दिलाय.

युवासेनेचे वरुण सरदेसाईंची (Yuvasena Varun Sardesai) युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी (expulsion) करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदे गटाने शिवसेनेला मोठा धक्का दिल्याने पुन्हा एकदा शिंदे गट आणि शिवसेनेत नवा वाद चिघळण्याची शक्यता आहे. वरुण सरदेसाई यांच्या हकालपट्टीनंतर शिंदे गटाकडून किरण साळी यांची युवासेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले आहेत. ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील पदाधिकारी तसेच उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने शिवसैनिक शिंद गटात सहभागी झाले आहेत.

दुसरीकडे शिंदे गट आमिष आणि दबाव टाकून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या गटात समील होण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. आमदारांपाठोपाठ पक्षाचे खासदारही एकनाथ शिंदे गटात सामील होऊ लागल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष वाचविण्यासाठी सरसावले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.