यावल तहसील कार्यालयाच्या आवारातून जप्त डंपर चोरी; चौघांवर गुन्हा दाखल

0

 

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

यावल (Yawal) शहरातील विनापरवाना (Illegal) वाळू वाहतूक करणारे डंपर (Dumper) यावल महसूल विभागाने (Department of Revenue) जप्त केले होते. ते डंपर आज पाहते तीन च्या सुमारास चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी यावल पोलिसात चारजणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

यावल शहरातून डंपर क्रमांक MH19 86 56 या डंपर मधून वाळू वाहतूक करीत असताना यावल महसूल पथकाने सदर वाहन जप्त करून, तहसील कार्यालयाच्या आवारात लावले होते. गुरुवार दि. 13 ऑक्टोबर रोजी पहाटे तीन ते सहा वाजेच्या दरम्यान गणेश गंगाराम कोळी (23) रा. ममुराबाद, संदीप आधार सोळंके रा. कोळन्हावी ता.यावल. यांच्यासह इतर दोघांनी तहसील कार्यालयाच्या आवाराचे बंद गेट तोडून आत प्रवेश करत, सहा लाख रुपये किमतीचे वाळूचे डंपर चोरून नेले. अशा आशयाची फिर्याद तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अधिकारी दीपक बाविस्कर यांनी यावल पोलिसात दिली. व संशयित आरोपी गणेश कोळी, संदीप सोळुंके यांचे सह इतर दोन असे चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर या करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.