मृत गर्भवतीचे पोट फाडून बाळ बाहेर काढले… मध्यप्रदेशातील अमानवीय प्रकार…

0

 

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क:

मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) एक अमानवीय घटना उघडकीस आली आहे. सासरच्या लोकांनी 8 महिन्यांच्या एका मृत गर्भवतीचे पोट फाडून तिचे बाळ बाहेर काढल्याची विचित्र घटना घडली आहे. सासरच्या लोकांनी एका स्वच्छता कर्मचाऱ्याला बोलावून त्याच्या कडून मयत स्त्रीचे पोट फाडून बाल बाहेर काढले. सदर मृत महिलेची आई गौराबाई या घटनेचा व्हिडिओ घेऊन पोलीस (Police) ठाण्यात पोहोचल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला.

गौराबाईच्या तक्रारीनुसार सासरच्यांनी आम्हाला आमच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानंतर आम्ही अंत्यसंस्कारासाठी गेलो. तिथे सासरच्यांनी मृतदेह तिरडीवरून उचलून बाजूला ठेवला होता. तसेच एक स्वच्छता कर्मचारी मुलीचे पोट फाडून तिच्या पोटातील बाळ बाहेर काढत होता. बाळ मृत्तावस्थेत होते. त्याच्यावर व त्याच्या आईवर स्वतंत्रपणे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ कुणीतरी तयार केला होता.

SP कार्यालयात तक्रार घेऊन पोहोचलेल्या मृत महिलेची आई गौराबाई यांनी सांगितले की, त्यांच्या 25 वर्षीय मुलीचे राधाचे 24 एप्रिल 2021 रोजी पनागरच्या गोपी पटेलशी लग्न झाले होते. लग्नापासून सासरच्या लोकांनी हुंड्यात दुचाकी देण्याचा तगादा लावला होता. मुलगी राधा 8 महिन्यांची गरोदर होती. 17 सप्टेंबर रोजी तिचा संशयास्पद मृत्यू झाला. गौराबाईने मुलीचे पोट फाडण्याचा व्हिडिओ बुधवारी तक्रारीसह पोलिसांना सुपूर्द केला. पोलिस या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेत आहेत. पनागर ठाण्याचे प्रभारी आर के सोनी यांनी या घटनेच्या तपासाअंती दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली.

आर के सोनी यांनी सांगितले की, पोलिसांनी मृत महिलेच्या माहेर व सासरच्यांना बोलावून चौकशी केली. त्यात सासरच्यांनी हिंदू परंपरेनुसार एकाचवेळी दोघांवर अंत्यसंस्कार केले जात नसल्यामुळे असे केल्याचा दावा केला. आता आम्ही या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेत आहोत. त्यानंतर एफआयआर दाखल केली जाईल. या प्रकरणी स्वच्छता कर्मचाऱ्यावरही गुन्हा दाखल केला जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.