लाजीरवाणी घटना.. विरोधक- सत्ताधाऱ्यांमध्ये तुफान राडा ! Video

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अत्यंत लाजिरवाणी घटना घडली आहे. राज्यात मोठ्या सत्तासंघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) सत्तेत आल्यानंतर या सरकारचे पहिलेच पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) पार पडत आहे. अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस असून, विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की करत तुफान राडा  (Vidhan Bhavan Rada) झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

प्रकरण थेट धक्काबुक्कीपर्यंत

महाराष्ट्रात एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह अनेक मुद्दे महत्त्वाचे असताना लोकप्रतिनिधींकडून अशा घटना घडणं अत्यंत शरमेची बाब आहे. सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले. त्याचवेळी विरोधकदेखील पायऱ्यांवर घोषणा देत आंदोलन करत होते. यावेळी अचानक एकनाथ शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitakri on MLA Fight) यांच्या सुरुवातीला शाब्दीक वाद झाले आणि त्यानंतर हे प्रकरण थेट धक्काबुक्कीपर्यंत गेले.

समजुतीचा मार्ग काढत वाद थांबला

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांनी समजुतीचा मार्ग काढत सुरू असलेला वाद थांबवला. या वादात अमोल मिटकरी यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसून आले. शिंदे गटातील नेत्यांनी सर्वात प्रथम शिवीगाळ केल्याचा आरोप मिटकरांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. आई-बहिणींनीवरुन शिवीगाळ केल्याचा आरोपही मिटकरी यांनी केला आहे.

तर आम्ही शिंगावर घेऊ- भरत गोगावले

दरम्यान, विधीमंडळाच्या पायऱ्यांवरील या धक्कादायक प्रकारानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल, तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, असे म्हणत त्यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. आम्ही कुणाच्या आत जात नाहीत, आमच्या आत कुणी येऊ नये, असं गोगावले म्हणाले. आमच्या मार्गात आलं तर आम्ही सोडणार नाही, असे ते म्हणाले. त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली असे म्हणत आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असून, आम्ही डरपोक नसल्याचे गोगावले यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.