देशात टोमॅटो फ्लूचे सावट; केंद्राने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशात कोरोनाच्या (Covid 19) पाठोपाठ अनेक गंभीर आजार डोकं वर काढत आहेत. त्यातच टोमॅटो फ्लूचे (Tomato Flu) रुग्ण देखील सध्या देशात झपाट्याने वाढत आहेत. लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने (Central government) एक सूचना (Guidelines) जारी केली आहे. या अ‍ॅडव्हायझरीमध्ये सर्व मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. सविस्तर अहवाल जारी केला आहे.

गाईडलाईन्स जारी

देशात आत्तापर्यंत टोमॅटो फ्लूची 82 रुग्ण आढळून आले आहे, यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मंगळवारी राज्य सरकारांना खबरदारी घेण्याच्या सुचना देत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. तसेच या व्हायरसविरोधात उपचार करण्यासाठी कोणतेही विशिष्ट औषध नसल्यावरही केंद्राने भर दिला आहे.

लहान मुलांचा सर्वाधिक समावेश

केरळनंतर (Kerala) कर्नाटक (Karnataka), तामिळनाडू (Tamil Nadu) आणि ओरिसामध्ये (Orissa) टोमॅटो फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. यात देशातील 82 रुग्णांमध्ये लहान मुलांचा सर्वाधिक समावेश आहे. यात लहान मुलांच्या अंगावर लाल रंगाचे फोड येतात आणि हळहळू ते फोड वाढत जातात. हे फोडनंतर टोमॅटोच्या आकाराचे होतात म्हणू या फ्लूला टोमॅटो फ्लू म्हणतात. यात लहान मुलांच्या हात, पाय आणि तोंडावर आजार खूप सामान्य आहेत. त्यामुळे प्रामुख्याने 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये हा आजार आढळतो.

काय आहे टोमॅटो फ्लू ?

टोमॅटो फ्लू हा एक विषाणूजन्य रोग आहे ज्यामध्ये टोमॅटोच्या आकाराचे फोड शरीरावर दिसतात. त्याची बहुतेक लक्षणे इतर व्हायरल इन्फेक्शन सारखीच राहतात. यामध्ये ताप, पुरळ, सांधेदुखी, थकवा, सुजलेले सांधे, घसा खवखवणे यांचा समावेश होतो. हा विषाणू सौम्य तापाने सुरू होतो, नंतर घसा खवखवणे देखील सुरू होते. तापाच्या दोन-तीन दिवसांनंतर शरीरावर लाल रंगाचे पुरळ दिसू लागतात जे नंतर फोडांमध्ये बदलतात. ते मुख्यतः तोंडाच्या आत, जिभेवर किंवा हिरड्यांमध्ये दिसतात.

संसर्ग झाल्यास काय करावे ?

– पाच ते सात दिवस स्वत:ला अलग ठेवा, आजार पसरणार नाही याची काळजी घ्या.

–  आपला परिसर स्वच्छ व साफ ठेवा. व्हायरल संक्रमित मुले इतर मुलांबरोबर खेळू देवू नका खेळणी देवू नका.

– फोडांना हात लावू नका, असे केले असेल तर लगेच हात धुवा.

– संसर्ग झालेल्या मुलांचे कपडे, भांडी हे सर्व वेगळे करावेत.

– पुरेशी विश्रांती घेणे महत्वाचे आहे, जलद बरे होण्यासाठी झोप प्रभावी आहे

संसर्ग झाला हे कसे कळेल ?

–  श्वसन नमुन्यांद्वारे सहज शोधता येते. आजारपणाच्या 48 तासांच्या आत श्वसनाचे नमुने दिले जाऊ शकतात.

–  हे विषाणू मल नमुन्यांद्वारे देखील शोधले जाऊ शकते. मात्र येथेही ४८ तासांत नमुना देणे आवश्यक आहे.

असा पसरतो टोमॅटो फ्लू

टोमॅटो फ्लूचे विशिष्ट कारण शोधण्यासाठी शास्त्रज्ञ अजूनही संशोधन करत आहेत, परंतु सध्या हा विषाणू संसर्गाचा एक प्रकार मानला जात असल्याची माहितीही देण्यात आली आहे. डेंग्यू किंवा चिकुनगुनियाचा हा दुष्परिणाम असू शकतो, असेही काहींनी सुचवले आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्याचा स्रोत हा व्हायरस आहे, परंतु तो कोणत्या विषाणूमुळे पसरत आहे किंवा कोणत्या विषाणूशी संबंधित आहे याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.

टोमॅटो फ्लूचे देशातील रुग्ण?

सध्या केरळमध्ये टोमॅटो फ्लूचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. जुलैपर्यंत पाच वर्षांखालील ८२ मुले या विषाणूच्या विळख्यात आली आहेत. वाढत्या केसेस पाहता तामिळनाडू, कर्नाटक सरकारही सतर्क झाले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.