उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद; काय आहे भूमिका ?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कालच ईडीने संजय राऊतांना अटक केली असून आज त्यांची कोर्टात पेशी आहे. दरम्यान आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या घरी भेट दिली. या भेटीत त्यांनी राऊतांच्या कुटुंबाची चौकशी केली, तसेच मी आपल्या बरोबर असल्याचे सांगितले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत. दरम्यान ठाकरेंच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे :-

संजय राऊतांवर मला अभिमान.

दिवस फिरले कि काय होतं ते शाह आणि नड्डानी पाहावं.

हिट्लरसारखी परिस्थिती देशात होतेय.

कोणी विरोधात बोललं कि कारवाई होते.

या राजकारणाची घृणा वाटतेय.

जनता निर्णय घेईल.

सत्ताधाऱ्यांनी बढाया मारू नये.

सत्ता येते आणि जाते म्हणून लोकांशी नम्र राहा.

काळ बदलत असतो.

स्थानिक अस्मिता, मराठी माणसाला चिरडून टाकण्याचा भाजपचा कट.

शिंदेंबाबत मी काय बोलावं ?.

आणीबाणीचा इतिहास काढून पहा.

देशातील सर्व जनतेने विचार करण्याची गरज.

ते सत्तेमुळे हवेत गेलेत. तसेच त्यांच्यावर सत्तेचा फेस जोवर आहे तोवर मजा करतील.

संजय राऊतांनी कोणता गुन्हा केला ?.

संजय निपक्ष पत्रकार आहे, त्याला जे खटकतं ते तो बोलतो त्यात गुन्हा काय ?.

बुद्धीपेक्षा बळाचा वापर केला जातोय.

ईडी, इन्कम टॅक्समुळे लोकशाही धोक्यात.

जे. पी. नड्डा यांचे भाषण अतिशय घातक.

संजय राऊत खरा शिवसैनिक. म्हणून ते झुकले नाहीत, जे झुकले ते बाळासाहेबांचे शिवसैनिक नाही.

ते सर्व पक्ष संपवून हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.