“तुम्ही शिंदेंना सोडा…”; ठाकरेंची फडणवीसांना ऑफर ?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात सत्ता संघर्ष होवून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली. तेव्हापासून शिवसेनेला लागोपाठ धक्के बसत गेले. दरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरूच आहे. त्यातच राजकीय गोटातून एक मोठी सूत्रांनी दिलीय.

“तुम्ही शिंदेना सोडा, मी सगळी शिवसेना घेऊन तुमच्यासोबत येतो.” अशी ऑफर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शपथविधीआधी फडणवीसांना (Devendra Fadnavis) दिल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर आता चर्चांना उधाण आलं आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फोन करत ही ऑफर दिली होती अशी माहिती समोर येत आहे. नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधी उद्धव ठाकरे यांनी फडवीसांना फोन केला होता आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हा, शिंदे यांना बाजूला ठेवा, मी सगळी शिवसेना घेऊन तुमच्याकडे येतो असं उद्धव ठाकरे फडणवीसांना म्हणाले होते अशी माहिती मिळाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.