हृता दुर्गुळेचा ‘टाईमपास ३’ लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सुप्रसिद्ध मराठी दिगदर्शक रवी जाधव यांच्या ‘टाइमपास 3’ या चित्रपटाची प्रेक्षक वर्गास आतुरता निर्माण झालेली आहे. दगडूच्या आयुष्यातील पहिलं प्रेम आणि लग्नापर्यंतचा प्रवास प्रेक्षकांनी बघितला मात्र जेव्हा दगडूला प्राजक्ता सोडून गेली तेव्हा नेमकं काय झालं, याची भन्नाट स्टोरी म्हणजे हा ‘टाइमपास 3′ आहे. हलकेपुलके विषय रवी जाधव अगदी सहजरित्या हाताळतात यामुळे रवी जाधव तरुणाईस भावतात.’टाइमपास 3’ मध्ये प्रेमाची वेगळीच दुनियादारी बघायला मिळणार आहे. आता पर्यंत आपण काहीसा टपोरी दगडू आणि सुशिक्षित, सभ्य घरातली प्राजक्ता यांची लव्हस्टोरी पाहिली. पण या तिसऱ्या भागात दगडूला त्याच्याहून वरचढ असलेली, थेट जिचे वडिलच गुंड आहेत अशी पालवी भेटणार आहे. यामुळे या चित्रपटात नेमकं काय घडून येणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

रवी जाधव यांच्या दिगदर्शित आणि झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन निर्मित या चित्रपटाच्या टिझरने आणि गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलेले आहे. आता चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतोय याची सर्वांना उत्सुकता लागून आहे. ‘टाइमपास 3’ मध्ये दगडू च्या भूमिकेत आपला लाडका प्रथमेश परब आहे तर पालवीची भूमिका अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने साकारली आहे. विशेष म्हणजे आजवर कधीच न बघितलेल्या अवतारात हृता आपल्याला यात दिसणार आहे. आजवर हृताने साकारलेल्या भूमिकांच्या अगदी विरोधाभासी ही भूमिका आहे. तिची भाषा, तिचा डॅशिंग अंदाज पाहून चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. असा हा ‘टाइमपास ३’ हा धम्माल चित्रपट येत्या २९ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.