शिंदे सरकार मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीत; मात्र शपथविधीवरून दोन मतप्रवाह

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालीस सुरुवात झालेली आहे. सध्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने तर्क वितर्क लावत आहे. कुणाला कुठलं मंत्रिपद मिळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असून शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या २० जुलै रोजी मुंबईत होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मंत्र्यांच्या शपथविधीवरून शिंदे सरकारमध्ये दोन मतप्रवाह आहे. काही जणांनी राज्यातील पूर परीस्थितीमुळे साधेपणानं राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी करण्याची मागणी आहे. तर काही होणाऱ्या मंत्र्यांनी विधान भवनातील प्रांगणात मोठ्या दिमाखात शपथविधी करण्याची मागणी केली जात आहे. अशा दोन्ही मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.