डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा भीषण स्फोट; इमारतींच्या फुटल्या काचा (व्हिडिओ)

0

डोंबिवली, लोकशाही न्युज नेटवर्क

डोंबिवलीमधून मोठी बातमी समोर आली आहे. डोंबिवली पुर्व एमआयडीसी फेज 2 मध्ये अंबर कंपनीत हा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे डोंबिवलीमध्ये भीतीचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट एवढा मोठा होता की, स्फोटाचे लांबपर्यंत हादरे बसले, काही इमारतींच्या काचा देखील फुटल्या, दरम्यान हा स्फोट नेमका कशाचा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये.

स्फोटानंतर भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

डोंबिवली पुर्व फेज 2 मध्ये एका कंपनीत हा भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट एवढा मोठा होता की, स्फोटानंतर जवळपास दोन किलोमीटरपर्यंत लोखंडाचे तुकडे उडाले. त्यानंतर आणखी दोन स्फोट झाल्याचं वृत्त आहे. स्फोटानंतर कांपनीला भीषण आग लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.